#कार्यकारिणी

Showing of 79 - 80 from 80 results
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या युतीवर प्रश्नचिन्ह

बातम्याMar 4, 2010

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या युतीवर प्रश्नचिन्ह

4 फेब्रुवारीनवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीचा अजूनही निर्णय झालेला नाही. तर या निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेससोबत स्वबळावर लढवाव्या अशी मागणी नवी मुंबईतील नेत्यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. नवी मुंबई महापालिकेत सध्या काँग्रेसचे 16 नगरसेवक आहेत. ही संख्या कमी असली तरी स्वबळावर लढलो तर या निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाला घरा-घरांत पोहोचवता येईल. किमान पक्षाची ताकद आजमवता येईल, अशी भूमिका नवी मुंबई काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नामदेव भगत यांनी मांडली आहे. मागील विधानसभा निवडणुकीतही नामदेव भगत यांनी बंडखोरी केली होती आणि त्यांना पक्षातूनच मोठा पाठिंबाही मिळाला होता.मनसेचा निर्णय रविवारीनवी मुंबई महापालिकेसाठी मनसे निवडणुक लढविणार की नाही, किंवा त्यांची रणनिती काय असेल, याचा निर्णय येत्या रविवारी होण्याची शक्यता आहे. या निवडणुकी संदर्भात स्थानिक पदाधिकार्‍यांची मते जाणून घेण्यासाठी मनसेच्या निवडणूक निरिक्षक समितीने नवी मुंबईत बैठक घेतली होती. या बैठकीचे अहवाल राज ठाकरे यांच्याकडे सोपवले जाणार असून येत्या रविवारी या स्वत: राज ठाकरे याबाबतचा निर्णय घेतील अशी शक्यता आहे. मध्यंतरीच्या काळात नवी मुंबईतील पदाधिकार्‍यांवर बेशिस्तीचा ठपका ठेऊन राज ठाकरेंनी संपूर्ण कार्यकारिणी बरखास्त केली होती