कारवार Videos in Marathi

VIDEO : भरसमुद्रात तरंगणारे मृतदेह आणि बोटीवर जीवमुठीत घेऊन बसलेले प्रवासी

व्हिडीओJan 21, 2019

VIDEO : भरसमुद्रात तरंगणारे मृतदेह आणि बोटीवर जीवमुठीत घेऊन बसलेले प्रवासी

21 जानेवारी : कर्नाटकमध्ये कारवार येथील कुरुमगड बेटाजवळ एक मोठी बोट दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला आहे. या बोटीत 24 प्रवाशी होते. ही बोट देवदर्शन करून कुरुमगडाकडे येत होती, तेव्हा या बोटीला अपघात झाला. भरसमुद्रात मृत्यूतांडवाने अक्षरश: थैमान घातले आहे. ज्या ठिकाणी बोट बोटीला त्यापासून काही अंतरावर भीषण दृश्य होतं. समृदात बुडालेली मृतदेह पाण्यावर तरंगत होती. ही दुर्घटना नेमकी कशामुळे घडली हे अद्याप कळू शकले नाही. घटनास्थळी कोस्ट गार्ड आणि पोलिसांच्या मदतीने मदतकार्य सुरू आहे. दक्षिण भारतातील आजपर्यंतची सगळ्यात मोठी दुर्घटना सांगितली जात आहे.