#कायदा

Showing of 1912 - 1925 from 1939 results
साबरमती जेल की 5 स्टार हॉटेल ?

बातम्याDec 16, 2008

साबरमती जेल की 5 स्टार हॉटेल ?

16 डिसेंबर साबरमतीजनक दवे 26 नोव्हेंबरला मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यानं सगळ्यांचेच डोळे उघडले. या हल्ल्यात 183 निरपराध लोकांचे बळी गेले. यावरून गुप्तचर यंत्रणा कशी खिळखिळी झालीय हे स्पष्ट झालं. एकीकडे ही स्थिती असताना देशाच्या दुस-या भागात म्हणजे साबरमती जेलमध्ये बेपर्वाई सुरू आहे. साबरमती जेलचा दरवाजा सर्वसामान्यांसाठी नेहमीच बंद असतो. हे जेल देशात सगळ्यात सुरक्षित असल्याचा दावा केला जातो. जेलमध्ये कुणाला भेटायलाही जायचं असेल, तरी कमीतकमी तीन वेळा तुमची तपासणी होते. परंतु साबरमती जेलच्या बाहेर जे काही दिसतं तो निव्वळ दिखावा आहे, फसवेगिरी आहे. याच साबरमती जेलमध्ये अक्षरधाम मंदिरावर हल्ला करणारे अतिरेकी, काश्मीरमध्ये अटक केलेले अतिरेकी या जेलमध्ये ठेवण्यात आले आहेत. पण या जेलमध्ये कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडला आहे. इथल्या अधिका-यांनी त्याला फाईव्ह स्टार जेलमध्ये बदलून टाकलं आहे.साबरमती जेलच्या आतमध्ये गेल्यावर मोठ्ठ मैदान आहे.एक झाडं आणि सगळीकडं कैद्यांची रेलचेल.या कैद्यांमध्ये काही आतंकवाद्यांचाही समावेश आहे. या जेलमध्ये हे आतंकवादी कुठलीही कारवाई करू शकणार नाहीत असं समजून त्यांना साबरमती जेलमध्ये ठेवण्यात आलं आहे. पण वस्तुस्थीती वेगळी आहे.साबरमती जेलमधल्या कैद्याच्या हाती मोबाईल फोन आहेत. आणि इथले कैदी त्याचा सर्रास वापर करतात.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,साबरमती जेलमध्ये चालणा-या या पीसीओचे स्वतंत्र रेट आहेत. मिस कॉल करण्यासाठी 20 रुपये. एक मिनिट बोलण्यासाठी 30 ते 40 रुपये.तर मोबाईल चार्ज करण्यासाठी एक हजार रुपये. आणि माहीती अशी की, ह्या जेलमध्येच कैदी म्हणून आहे साबरमती जेलमध्ये चालणा-या पीसीओचा मालक. दुसरीकडे सगळे कैदी मस्त बैठक ठोकून पत्ते खेळत आहेत. आणखी पुढे गेल्यावर दोघे स्वयंपाकासाठी जाळ पेटवत आहेत. म्हणजे स्वयंपाकासाठी लागणारं सगळं सामान जेलमध्ये उपलब्ध आहे. प्रत्यक्षात जेलमध्ये आग पेटवण्यावर बंदी आहे. पण या कैद्यांना स्वयंपाकासाठी लागणारं साहित्य आलं कोठून हे सांगायला नकोच.साबरमतीमधल्या कैद्यांना कुणाचीही भीती उरलेली नाही. हे कैदी साबरमती जेलमध्येही ते एक स्वतंत्र आयुष्य जगत आहेत. जे जेलबाहेरच्या लोकांसाठी धोकादायक आहे. समजा यातला एखादा आतंकवादी या जेलमध्ये बसून एखाद्या दहशतवादी हल्ल्यासाठी मदत करत असेल तर...