#काँग्रेस

Showing of 8919 - 8932 from 9833 results
राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी मोर्चे बांधणी

बातम्याJul 21, 2011

राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी मोर्चे बांधणी

21 जुलैराज्यसभेच्या एका जागेसाठी होणार्‍या पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. काँग्रेस आघाडीकडून हुसेन दलवाई आणि शिवसेना-भाजप युतीकडून बाळ माने याची उमेदवारी आधीच जाहीर झाली. काँग्रेसला पाठिंबा देणार्‍या अपक्ष आमदारांनी मतदानावर बहिष्कार घालायचा ठरवल्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना जोर आला आहे. आज यासाठी मुंबईत काँग्रेस विधीमंडळ पक्षाची बैठक होत आहे. यामध्ये काँग्रेसला पाठिंबा देणारे आमदार हजर राहणार आहेत. सोबतच संध्याकाळी 5 वाजता राष्ट्रवादीनेही आमदारांची बैठक बोलावली आहे. संध्याकाळी साडेसात वाजता काँग्रेस राष्ट्रवादीच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठकही मंुबईत होतेय. या बैठकीत उद्या होणार्‍या निवडणूक आणि मतादानाचे नियोजन केलं जाणार आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेससोबत असलेले अपक्ष आमदार दलवाईंना मत देण्यावर ठाम आहेत हे सांगत आमची एकूण 75 मतं आहेत ती दलवाईंना मिळतील, हे अजित पवारांनी स्पष्ट केलं.दरम्यान या प्रकरणी आघाडीला पाठिंबा देणार्‍या अपक्ष आमदारांच्या गटातच फूट पडली आहे. त्यामुळे काही आमदार हुसेन दलवाई यांना मतदान करणार असल्याचे अपक्ष आमदार शिरीष चौधरी यांनी आयबीएन लोकमतला सांगितले. मी मतदान करणारच आहे. रवी राणा आमचे नेते नाहीत तर केवळ सहकारी आहेत अस त्यांनी स्पष्ट केलं. रवी राणा यांनी या निवडणुकीत काँग्रेसला पाठिंबा देणारे अपक्ष आमदार मतदान करणार नाहीत, असं म्हटल होतं.