#काँग्रेस अध्यक्ष

Showing of 625 - 634 from 634 results
महिला विधेयक मंजूर

बातम्याMar 9, 2010

महिला विधेयक मंजूर

9 फेब्रुवारीअखेर महिला विधेयक राज्यसभेत आवाजी बहुमताने मंजूर झाले आहे. दोन तृतीयांश बहुमताने हे विधेयक मंजूर झाले आहे. विधेयकाच्या विरोधकांनी मात्र यावेळी मोठी घोषणाबाजी केली. महिला आरक्षण विधेयक मांडताना गोंधळ घालणार्‍या 7 खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. पण या खासदारांनी राज्यसभा सोडायला नकार दिला. आणि त्यांनी राज्यसभेतच धरणे आंदोलन सुरू केले. त्यामुळे राज्यसभेत मार्शल बोलावण्यात आले. आणि त्यांनी या खासदारांना बळजबरीने बाहेर काढले. आता सभागृहात मतदानाची प्रक्रिया सुरू झाली आहे. इलेक्ट्रॉनिक पद्धतीने हे मतदान होत आहे.दरम्यान भाजपचा या विधेयकाला पाठिंबा आहे. पण मतदानाच्या अगोदर या विधेयकावर चर्चा व्हावी, अशी मागणी विरोधी पक्ष नेते अरूण जेटली यांनी केली आहे. 'हे राजीव गांधींचे स्वप्न' तर विधेयकाला मंजुरी मिळाल्याने काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी दिलेले वचन पूर्ण केले आहे, असे जयंती नटराजन म्हणाल्या. हे महिला आरक्षण राजीव गांधी यांचे स्वप्न होते, असेही त्या म्हणाल्या.महिलांच्या हक्कांसाठी सदैव प्रयत्नशील असणार्‍या यूपीएने गेल्या 60 वर्षात जे कोणालाही जमले नाही, ते करून दाखवले आहे, असेही नटराजन म्हणाल्या. 'ही ऐतिहासिक घटना' तर गेल्या 14 वर्षांपासून महिला या आरक्षणासाठी लढत होत्या. हे विधेयक मंजूर होणे म्हणजे एक ऐतिहासिक घटना असेल, असे कम्युनिस्ट नेत्या वृंदा करात यावेळी म्हणाल्या. या विधेयकाला पाठिंबा देणार्‍या सर्व पुरुषांचे त्यांनी आभार मानले. तसेच हे विधेयक एका ठराविक वर्गातील महिलांसाठी नाही, आणि हे आरक्षण म्हणजे पुरूष विरुद्ध महिला असा संकुचित लढाही नव्हे, असेही त्यांनी राज्यसभेत बोलताना स्पष्ट केले.आवाजी मतदानाने मंजूर झालेल्या या विधेयकाच्या इथून पुढच्या प्रवासावर एक नजर टाकूयात- विधेयकाच्या मंजुरीसाठीराज्यसभेत 155 मतांची गरजराज्यसभेत सध्या 165 मतेविधेयकाच्या बाजूने आहेत, तर 30 खासदारांचा मात्र विरोध आहेराज्यसभेत संमत झाल्यानंतरचविधेयक लोकसभेत सादर होणारलोकसभेत विधेयकाच्यासंमतीसाठी दोनतृतीयांश मतांची गरजलोकसभेत मंजूर झाल्यानंतर विधेयकाचा कायदा होण्यासाठी देशभरातील विधानसभा महत्त्वाच्यामहिला आरक्षण विधेयकदेशातील निम्म्याविधानसभांनी संमत करणे आवश्यकतृणमूलचा बहिष्कारतृणमूल काँग्रेसचे दोन्ही खासदार या विधेयकाच्या मतदानाला गैरहजर राहणार आहेत. तृणमूलचे राज्यसभेत 2 खासदार तर लोकसभेत 19 खासदार आहेत.