#कविता

Showing of 79 - 92 from 98 results
यशवंतराव चव्हाण यांची कर्मभूमी !

बातम्याMar 12, 2012

यशवंतराव चव्हाण यांची कर्मभूमी !

प्रताप नाईक, कराड12 मार्चआधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून यशवंतराव चव्हाण यांची ओळख. साहित्यिक, राजकारणी,रसिक,वक्तृत्वपट्टु असे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू...यशवंतरावांची जन्मभूमी ही सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्रे पण त्यांची कर्मभूमी मात्र कराडच राहिली.12 मार्च 1913 ला सांगली जिल्ह्यातल्या देवराष्ट्रे इथं यशवंतराव चव्हाणांचा जन्म झाला. त्यानंतर कराडमधील वास्तव्यानं यशवंतरावांचं व्यक्तिमत्त्व तावून -सुलाखून घडलं. याच वयात सत्यशोधक विचारसरणीचा पगडा त्यांच्यावर पडला. कराड इथल्या नगरपरीषदेच्या शाळेत त्यांचं शिक्षण झालं. वयाच्या चौथ्या वर्षापासून ते पार्लमेंटरी सेक्रटरी होईपर्यंत यशवंतरावाचे वास्तव्य कराडमध्येच होतं महाविद्यालयीन जीवनातच त्यांनी देशसेवेला वाहुन घेण्याचा निर्णय घेतला.आई विठाबाईचे संस्कार, साधेपणा, जिद्द, चिकाटी , स्वाभिमान, सर्वधर्मसमभाव वृत्ती अशा गुणांचा यशवंतरावांच्या व्यक्तीमत्वावर प्रभाव पडला. कराडमधील सामाजिक आणि राजकीय चळवळीचे संस्कार यशवंतरावांवर झाले. पुर्वी कराडच्या याच कृष्णा घाटावर स्वातंत्र्य चळवळीच्या अनेक सभा होते होत्या त्यावेळी विद्यार्थी दशेत असणारे यशवंतराव चव्हाण. इथली भाषणं ऐकायला आवर्जुन उपस्थित असायचे. याचं क्रांतीकारक भाषणांचा प्रभाव त्याच्या व्यक्तीमत्वावर पडला. 1946 ला निवडणुका जाहीर झाल्या.त्यावेळी यशवंतराव चव्हाण यांच्या पत्नी वेणुताई आजारी होत्या. त्यामुळे कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर होती. त्यांच्या मित्रांनी निवडणूक लढविण्याचा अट्टाहास धरला, पण त्यांनी नकार दिला. पण त्यांचे मोठे भाऊ गणपतरावांनी त्यांना निवडणूक लढवण्यास प्रवृत्त केलं आणि हाच निर्णय मोलाचा ठरला. यशवंतराव चव्हाण पहिल्यांदा निवडून आले आणि तिथूनच खर्‍या अर्थानं त्याच्या राजकीय वाटचालीला सुरवात झाली. कवी राजा मंगसुळीकर म्हणतात, मला प्रसंग आठवतो ज्या वेळी त्यांना केंद्र सरकारने संरक्षण मंत्री म्हणून बोलावलं तेव्हा मुंबईला सभा सुरु होती. यशवंतराव दिल्लीला जाणारं. मावळ्या सुर्याला साक्ष ठेवून हा सह्याद्री हिमालयाच्या मदतीला निघाला. हे जे वाक्य होतं. त्या वाक्याचं घर माझ्या मनात झालं. आणि त्यातुनच हि कविता उमगली म्हणूनचं मी म्हणतो. हिमालायच्या मदतीला सह्याद्री हा धावून गेला मराठमोळ्या पराक्रमाने दिला दिशा इतिहासाला या मातीच्या कणाकणातून तुझ्या स्मृतीची फुलतील सुमने. जो भाषा असे मराठी तोवर यशवंत कवणे. महाराष्ट्राचा मंगल कलश त्यांनी आणला. त्यामुळे जो वर मराठी भाषा आहे. तोवर मराठी माणूस त्यांना विसरणार नाही.