#कल्याण डोंबिवली

Showing of 287 - 300 from 300 results
निवडणुकीसाठी नवी मुंबई महापालिका सज्ज

बातम्याMar 31, 2010

निवडणुकीसाठी नवी मुंबई महापालिका सज्ज

विनय म्हात्रे, मुंबई31 मार्च11 एप्रिल रोजी होणार्‍या नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी महापालिका सज्ज झाली आहे. या निवडणुकांमध्ये नव्या मुंबईतील अतिसंवेदनशील आणि संवेदनशील प्रभागातील मतदान केंद्रावर आता वेब कॅमेरे बसविणार आहेत. एकूण 16 वेब कॅमेरे बसविले जाणार असल्याचे महापालिका आयुक्त विजय नाहटा यांनी सांगितले आहे.नवी मुंबईतील एरोली विभाग हा अतिसंवेदनशील विभाग म्हणून गणला जातो. ऐरोली विभागातील बहुतांश प्रभागाचा इतिहास पाहता येत्या निवडणुकांमध्ये कोणतीही गडबड होऊ नये, यासाठी 22 अतिसंवेदनशील आणि 42 संवेदनशील मतदान केंद्रावर हे वेब कॅमेरे लावण्यात येणार आहेत. बोगस मतदान होऊ नये यासाठी महापालिकेने सर्वतोपरी तयारी केली आहे. बोगस रेशनिंग कार्डचा वापर बोगस मतदानासाठी होतो. यासाठी 640 मतदान सेंटरवर 640 रेशनींग कर्मचारी नेमण्यात येणार आहेत.एकूण 6 लाख 29 हजार मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. पण यामध्ये मोठ्या प्रमाणावर मतदार याद्यांमध्ये घोळ आढळल्याने महापालिकेने निवडणुकीसाठी आपला वेगळा पॅटर्न तयार केला आहे.नवी मुंबईच्या इतिहासात प्रथमच निवडणुकांमध्ये मतदान केंद्रांवर नवी मुंबई महापालिकेच्या हद्दी बाहेरील कर्मचारी असणार आहेत. कल्याण, डोंबिवली, ठाणे, मिरा-भाईंदर येथील हजारो कर्मचारी दाखल होणार आहेत.नवी मुंबई पोलीस आणि नवी मुंबई, महापालिकेने संयुक्तरित्या निवडणुकीचे प्लॅनिंग केले आहे. यामुळे ही निवडणूक शांततेत पार पडेल, अशी आशा दोन्ही विभागांना आहे.