Elec-widget

#कर्मचारी

Showing of 66 - 79 from 137 results
VIDEO : विज कर्मचाऱ्यांवर गावकऱ्यांचा हल्ला

व्हिडिओSep 20, 2018

VIDEO : विज कर्मचाऱ्यांवर गावकऱ्यांचा हल्ला

नांदेड, 20 सप्टेंबर : नांदेडमध्ये महावितरणाच्या कर्मचाऱ्यांना गावकऱ्यांकडून बेदम मारहाण झालीय. धर्माबाद तालुक्यात विजचोरी पकडण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांना गावकऱ्यांनीच मारहाण केलीय. महावितरणाकडून विशेष मोहीमेअंतर्गत 15 जणांचं पथक धर्माबाद तालुक्यातील विविध गावात कारवाया करत होतं. आकोडे टाकून वीज चोरी करणाऱ्यांवर कारवाई होत असताना काहींनी याला विरोध करून वाद घातला. तेव्हा 40 ते 50 गावकऱ्यांनी महावितरणच्या पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केली. यात सात कर्मचारी जखमी झालेत. त्यात एका महिलेचाही समावेश आहे. धर्माबाद पोलिसांनी 11 वीज चोरांविरोधात गुन्हा दाखल केलाय.