कर्मचारी Videos in Marathi

Showing of 131 - 137 from 137 results
रेल्वे प्रवासात किरकोळ भाडेवाढ

बातम्याMar 14, 2012

रेल्वे प्रवासात किरकोळ भाडेवाढ

14 मार्चआपल्या भाषणात शेरोशायरी पेरत दिनेश त्रिवेदी यांनी आपलं पहिला रेल्वे बजेट सादर केलं. लोकप्रिय बजेट सादर करण्याची गेल्या दहा वर्षांची परंपरा त्रिवेदी यांनी यावेळी मोडली. लालूप्रसाद यादव आणि ममता बॅनजीर्ंनी जे करणं टाळलं होतं ते त्रिवेदींनी केलं. म्हणजेच त्यांनी रेल्वेच्या भाड्यात वाढ केली. आर्थिक संकटात सापडलेल्या रेल्वेला ट्रॅकवर आणण्याचा प्रयत्न त्रिवेदींनी केला. त्याशिवाय त्यांनी आपल्या बजेटमध्ये सर्वाधिक भर रेल्वे सुरक्षेवर दिला. त्यासाठी अनेक योजनांची घोषणा त्यांनी केली. 2012-13 या आर्थिक वर्षात रेल्वेसाठी तब्बल 60 हजार 100 कोटी रुपये खर्चाची तरतूद त्यांनी केली. रेल्वेला अत्याधुनिक बनवण्याचे उद्दिष्ट त्रिवेदींनी ठेवलंय....सुरक्षा...सुरक्षा...सुरक्षा...रेल्वेचे वाढते अपघात रोखण्यासाठी दिनेश त्रिवेदी यांनी आपल्या बजेटमध्ये सुरक्षेवर सर्वाधिक भर दिला. रेल्वे रुळ ओलांडताना होणार्‍या अपघातांचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळेच येत्या 5 वर्षांत कर्मचारी नसलेले रेल्वे क्रॉसिंग बंद करण्याची महत्त्वाची घोषणा त्रिवेदींनी केली. रेल्वे सुरक्षा प्राधिकरणाची स्थापना करण्यात येणार आहे. हाय स्पीड रेल्वे सुरक्षा समितीची स्थापना करून त्याच्या प्रमुखपदी अनिल काकोडकर यांची नेमणूक केली जाणार आहे. 2 हजार कोटींचा रेल्वे सुरक्षा निधी उभारणार, अपघातानंतरही न उलटणारे रेल्वे कोच बनवणार.2012-13 या वर्षांत तब्बल 1 लाख नोकरभर्ती करण्याची महत्त्वाची घोषणा त्रिवेदी यांनी केली. त्याचबरोबर कर्माचार्‍यांना रेल्वेला आधुनिक करण्यासाठी पायाभूत सुविधांवरही त्रिवेदींनी भर दिला. 12 व्या योजनेअंतर्गत रेल्वेत 3.5 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहेत. त्यातले अडीच कोटी रुपये पायाभूत सुविधांवर खर्च केले जाणार आहेत.- रेल्वे स्टेशनच्या विकासासाठी स्वतंत्र प्राधिकरण- आदर्श स्टेशन्स योजनेखाली 929 स्टेशन्सचं अत्याधुनिकरण - 100 रेल्वे स्थानकांचा विकास एअरपोर्टच्या धरतीवर करणार- केटरींग सेवांसाठी जागतिक स्तरावर निविदा काढल्या जाणार - अपंगांसाठी खास सोय असलेले डबे बसवणार- वेटिंग लिस्टवरील प्रवाशांसाठी इतर गाड्यांमध्ये सोय- 2012-13 साठी 1 हजार 25 मेट्रिक टन मालवाहतुकीचं लक्ष्य2012-13 या वर्षात रेल्वेच्या खर्चासाठी 60 हजार 100 कोटींची भरघोस तरतूद करण्यात आली. आजपर्यंतची ही सर्वात मोठी तरतूद आहे. त्याशिवाय काही नव्या रेल्वेगाड्यांची घोषणाही करण्यात आली आहे.- 75 नव्या एक्सप्रेस ट्रेन्स- 21 नव्या पॅसेंजर ट्रेन्स- 39 रेल्वेंच्या प्रवासाच्या अंतरामध्ये वाढ - 23 रेल्वेंच्या फेर्‍या वाढणार ग्रीन रेल्वेवर दिनेश त्रिवेदींनी भर दिला आहे. त्यासाठी 2500 कोचेसमध्ये बायो टॉयलेट्स बसवण्यात येणार आहेत. रेल्वेतल्या खेळांडूना प्रोस्ताहीत करण्यासाठी रेल खेल रत्न पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. रेल्वे सुरक्षेवर भर- येत्या 5 वर्षांत कर्मचारी नसलेले सर्व रेल्वे क्रॉसिंग बंद - रेल्वे सुरक्षा प्राधिकरणाची स्थापना - हाय स्पीड रेल्वे सुरक्षा समिती, अनिल काकोडकर प्रमुखपदी - 2 हजार कोटींचा रेल्वे सुरक्षा निधी - अपघातानंतरही न उलटणारे रेल्वे कोच पायाभूत सुविधांवर भर- रेल्वे स्टेशन्सच्या विकासासाठी स्वतंत्र प्राधिकरण- आदर्श स्टेशन्स योजनेखाली 929 स्टेशन्सचं अत्याधुनिकीकरण- 100 रेल्वे स्टेशन्सचा एअरपोर्टच्या धर्तीवर विकास- केटरिंगसाठी जागतिक स्तरावर निविदा - अपंगांसाठी खास सोय असलेले डबे - वेटिंग लिस्टवरच्या प्रवाशांची इतर गाड्यांमध्ये सोय- 2012-13 साठी 1 हजार 25 मेट्रिक टन मालवाहतुकीचं लक्ष्यनव्या रेल्वेंची घोषणा- 75 नव्या एक्सप्रेस ट्रेन्स- 21 नव्या पॅसेंजर ट्रेन्स- 39 रेल्वेंच्या प्रवासाच्या अंतरामध्ये वाढ - 23 रेल्वेंच्या फेर्‍या वाढणार किरकोळ भाडेवाढ (प्रति किमी)लोकल - 2 पैसेएक्सप्रेस सेकंड क्लास - 3 पैसे स्लीपर कोच - 5 पैसे एसी चेअर कार, एसी 3 टियर - 10 पैसे एसी 2 टियर - 15 पैसे एसी फर्स्टक्लास - 30 पैसे प्लॅटफॉर्म तिकीट - 3 रुपयांवरून 5 रुपये

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading