Elec-widget

#कर्नाटक विधानसभा

Showing of 66 - 70 from 70 results
कर्नाटकात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले

देशMay 11, 2013

कर्नाटकात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले

20 मार्चकर्नाटक : मुख्य निवडणूक आयुक्त संपत यांनी आज कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली आहे. विधानसभेसाठी एकाच टप्प्यात म्हणजे 5 मे रोजी मतदान होईल तर तीन दिवसांनंतर म्हणजे 8 मे रोजी मतमोजणी होईल. निवडणुकीच्या घोषणेबरोबरच संपूर्ण राज्यात आचारसंहिता लागू झालीय. कर्नाटक विधानसभेच्या एकूण 224 जागा आहेत. तर मतदारांची संख्या आहे 4 कोटी 18 लाख. ही निवडणूक काँग्रेस आणि भाजप दोघांसाठीही प्रतिष्ठेची आहे. कर्नाटकात नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसला घवघवीत यश मिळालंय. शिवाय राहुल गांधी काँग्रेसचे उपाध्यक्ष झाल्यानंतरही ही पहिलीच मोठी निवडणूक आहे. अंतर्गत वादात सापडलेल्या भाजपच्या अडचणी मात्र वाढल्या आहेत. भाजपातून बाहेर पडत माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी कर्नाटक जनता पक्ष स्थापन केलाय. या पक्षात येडियुरप्पा वगळता इतर मोठा चेहरा नसला तरी या पक्षाचा सामना भाजपला करावा लागणार आहे. तिकडे देवेगौडा यांच्या धर्मनिरपेक्ष जनता दलाला सामान्य कार्यकर्त्यांमध्ये असलेल्या नाराजीचा सामना करावा लागणार आहे.