करणार Videos in Marathi

Showing of 742 - 742 from 742 results
ग्रेट भेट मिकी कॉन्ट्रॅक्टरशी

May 13, 2013

ग्रेट भेट मिकी कॉन्ट्रॅक्टरशी

ग्रेट भेटच्या एक नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळे यांनी भारतातले नंबर वन मेकअप आर्टिस्ट मिकी कॉन्ट्रॅक्टर यांची मुलाखत घेतली. मिकी कॅन्ट्रॅक्टर यांनी आजपर्यंत हेमा मालिनीपासून माधुरी दीक्षितपर्यंत, काजोलपासून ऐश्वर्या रायपर्यंत असंख्य सिनेतारकांचे मेकअप केले आहेत. आमीर खानने जेव्हा स्त्री चा रोल केला, तेव्हाही त्यामागची करामत मिकी कॉन्ट्रॅक्टर यांचीच होती. मिकी हे भारतातले असे एकमेव मेकअप आर्टिस्ट आहेत, ज्यांना आंतरराष्ट्रीय कंपनीने ब्रॅण्ड अ‍ॅम्बॅसिडर बनवलं. त्यांच्याबाबत असं म्हणतात की त्यांनी मेकअपच्या कलेला नवा आयाम दिला. मिकी कॉन्ट्रॅक्टर यांच्या ग्रेट व्यक्तिमत्वाचे असंख्य पैलू या मुलाखतीतून उलगडले गेले.निखिल वागळे - तू अशा काळात तुझं करियर सुरु केलंस, जेव्हा मेकअप आर्टिस्टला फारसा मान मिळत नव्हता. आज तू एक स्टार बनला आहेस. टॉप स्टारच्या तोडीची वागणूक तुला मिळते. हे सगळं तुला कसं काय जमलं ?मिकी कॉन्ट्रॅक्टर -मी काही कोणी स्टार वगैरे नाही. गेली तीस वर्ष मी मनापासून काम केलं, जे काही माझ्या वाट्याला आलं ते देवाचे आभार मानून स्वीकारलं. हे खरं आहे की मी जेव्हा माझ्या करियरला सुरुवात केली, तेव्हा मेकअप आर्टिस्टला फारसा मान नव्हता. म्हणजे स्पॉटबॉयपेक्षा जरा बरी वागणूक मेकअप आर्टिस्टला मिळायची. पण इतरांपेक्षा माझं बॅकग्राउन्ड जरा वेगळं होतं. मी उत्तम इंग्रजी बोलू शकायचो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ' मेकअप काय करू शकतो ', याविषयी माझं जे व्हीजन होतं, त्यामुळे इतरांपेक्षा मला जरा जास्त रिस्पेक्ट मिळाला. 'निखिल वागळे - तू ज्या काळी हे वेगळं करियर निवडलंस, तेव्हा त्याला फारसं ग्लॅमर नव्हतं. तुझ्या कुटुंबातलं कोणीच फिल्म इंडस्ट्रीत नव्हतं. तुझा निर्णय म्हणजे एक प्रकारे बंडखोरीच होती.एका मध्यमवर्गीय पारशी कुटुंबातल्या मुलाला ही परवानगी कशी मिळाली ?मिकी कॉन्ट्रॅक्टर - सहजासहजी परवानगी नाहीच मिळाली. मी जेव्हा माझ्या आईला सांगितलं की मला हेअर ड्रेसर बनायचंय, तेव्हा तर तिला वाटलं की मी आता हजाम बनणार. माझी आई ही सिंगल पॅरेन्ट होती. खूप लहानपणी तिचा घटस्फोट झाला होता. माझे मामा बँकेत होते. आई जेफ्री मॅनर्समध्ये काम करत होती. म्हणजे फिल्म इंडस्ट्रीशी दुरान्वयेही कोणाचा संबंधच नाही. माझ्या आईच्या इच्छेखातर मी सहा महिने कॉलेज केलं. त्यातले मोजून तीन दिवस मी लेक्चर्स अटेन्ड केली. इतर दिवस मी फक्त टाइमपास केला, कारण कॉलेजमध्ये माझं लक्षच लागत नव्हतं. मग मी आईला म्हणलो की मला इंट्रेस्ट नसताना कशाला तुझे पैसे वाया घलवतेस ? शेवटी माझे मामा मला म्हणाले की, मी तुला हेअर ड्रेसरच्या कोर्सला अ‍ॅडमिशन घेऊन देतो, पण एका वर्षात तू ते पैसे कमवायला हवेत, नाहीतर तू परत कॉलेजला जायचं. या अटीवर मी हेअर ड्रेसरच्या कोर्सला अ‍ॅडमिशन घेतली.निखिल वागळे - तुला मेकअप आर्टिस्टच बनावं असं का वाटलं ?मिकी कॉन्ट्रॅक्टर - मला पहिल्यापासून हिंदी चित्रपटांचं वेड होतं. ' दादर पारसी युथ असेम्बली ' या शाळेत असताना मी, माझे मामा आणि माझी आजी दर शनिवारी चित्रपट बघायचो. त्यावेळेस हेलनच्या हेअरस्टाइलनी मी प्रचंड इम्प्रेस झालो होतो. मेकअप आणि हेअरस्टाइलच्या बाबतीत ती काळापेक्षा बरीच पुढे होती. त्याकाळी मेकअपचं फारसं साहित्यही उपलब्ध नव्हतं. आज आम्ही तीन तीन सुटकेस घेऊन फिरतो, पण त्या काळी आमचं साहित्य म्हणजे झाडाखाली बसणार्‍या न्हाव्याच्या पेटीतंही मावू शकलं असतं. पण त्यातंही हेलन फार छान मेकअप आणि हेअरस्टाइल करायची. त्यातून मला प्रचंड प्रेरणा मिळाली. मला असं वाटायचं की हे सगळं ती कशी करत असेल ? आणि जर ती करू शकत असेल, तर इतरांच्या बाबतीतही मी ते करायला काय हरकत आहे ? मग मी हेअर ड्रेसर बनायचं ठरवलं. नंतर मी ' टोकियो ' पार्लर जॉइन केलं. तिथं कियोको मोटोशिडुमिझो म्हणून बाई होती, तिनं मला हेअर ड्रेसिंग शिकवलं. तिथे मी एकटाच मुलगा होतो, आणि तिचा मी खूप फेव्हरेट होतो. आणि सुदैव म्हणजे हेलनसुद्धा याच पार्लरमध्ये यायची. पहिल्यांदा तर मी तिला ओळखलंच नाही. नंतर तिच्याशी माझी चांगली ओळख झाली. मग तिनं मला सुचवलं की तू मेकअप आर्टिस्ट का बनत नाहीस ? तिला माहित होतं की त्यावेळी इंडस्ट्रीमध्ये पुरुष मेकअप करायचे आणि स्त्रिया हेअर स्टाइल. मग तिचा सल्ला ऐकून मी पंढरीदादा जुकर, जे त्यावेळचे टॉपमोस्ट मेकअप आर्टिस्ट होते, त्यांना जॉइन झालो.निखिल वागळे - पंढरीदादा हे त्या काळचे टॉपमोस्ट मेकअप आर्टिस्ट होते. त्यांच्या हाताखाली तू काय शिकलास ?मिकी कॉन्ट्रॅक्टर - पंढरीदादांच्या हाताखाली मी खूप बेसिक गोष्टी शिकलो. पण सहा-आठ महिन्यात किरकोळ कारणावरून मी तिथून बाहेर पडलो. नंतर खूपशा मराठी, गुजराती आणि रिजनल फिल्म्‌स केल्या. पण मग मला जाणवलं की म्हणावा तसा मान आणि पैसे मला मिळत नाहीये. मग मी अ‍ॅड्व्हरटाइजिंगकडे वळलो. तिथं बरंच नाव मिळवलं. आणि मग जेव्हा परत मला फिल्म्‌स ऑफर व्हायला लागल्या, तेव्हा मी परत इकडे वळलो.निखिल वागळे - फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रस्थापित व्हायला तुला बराच वेळ लागला. तुझ्या स्ट्रगलिंगच्या काळात हे क्षेत्र सोडावं, असं तुला कधी वाटलं का ?मिकी कॉन्ट्रॅक्टर - कधीच नाही. तेव्हा मला दिवसाला वीस रुपये मिळायचे आणि त्यातलेही काही पैसे मी साठवून ठेवायचो. मुळात फक्त पैशांसाठी मी या क्षेत्रात आलो नव्हतो. मला एक जिद्द होती, पॅशन होती. काहीतरी करून दाखवायचं होतं.निखिल वागळे - पॅशन म्हणजे तुला नेमकं काय करायचं होतं ?मिकी कॉन्ट्रॅक्टर - मला हेलनसारख्या हेअरस्टाइल्स करायच्या होत्या, पण ते काही जमलं नाही. कारण तेव्हा हिरॉइन्सची एक सती सीवित्रीसारखी प्रतिमा होती. आता हिरॉइन्स खूप वेगवेगळ्या लुकमध्ये दिसतात. पण तेव्हा ते लोकांच्या गळी उतरवणं बरच अवघड होतं. पूर्वीपासूनच आपल्याकडे खूप हेवी मेकअप करायची पद्धत आहे. हॉलिवुडमध्ये जेव्हा आपण हिरॉइनची स्कीन नॅचरल दिसायची. पण आपल्या इथे हिरॉइनच्या चेहर्‍यावर खूप मेकअप दिसायचा. मला हिरॉइनला शक्य तितकं नॉर्मल दाखवायचं होतं. त्यासाठी मी बराच प्रयत्न केले. पण ते करायला माझी बरीच वर्ष गेली. कारण आपल्या इथे कोणतेही बदल हे खूप हळूहळू स्वीकारले जातात. माझा विचार प्रत्यक्षात लोकांपर्यंत पोहचवायला मला साधारण 15 वर्ष लागली. बेखुदी ही जी माझी पहिली फिल्म होती, त्यात मी काजोलला शक्य तितका नॅचरल लुक देण्याचा प्रयत्न केला.निखिल वागळे - पण तुला इतका हेवी मेकअप नको होता, हे तू बर्‍याच लोकांना बोलला असशील, डायरेक्टर्सना समजावण्याचा प्रयत्न केला असशील. त्यांची प्रतिक्रिया काय होती ?मिकी कॉन्ट्रॅक्टर - खरं सांगायचं तर मी हे कोणाला सांगण्याच्या फंदात पडलो नाही. कारण त्यावेळी एका मेकअप आर्टिस्टला एवढा अधिकारच नव्हता. डायरेक्टर सांगायचा, खूप जास्त मेकअप आहे, कमी करा, की आम्ही ते ऐकायचो. पण मी माझे प्रयत्न चालू ठेवले. लक्सच्या जाहिरातीत मी माधुरी, जुही, रविना अशा अनेक हिरॉइन्सना कमी मेकअपमध्ये दाखवलं. त्याचवेळी माझी आणि गौतम राजाध्यक्ष यांची चांगली टीम जमली. त्यांनीही माझं म्हणणं उचलून धरलं. आणि मग जेव्हा लोकांना कळलं की कॅमेरावर हे चांगलं दिसतं, टीव्हीवर हे चांगलं दिसतं, तेव्हा चित्रपटातही कमी मेकअप स्वीकारला गेला.निखिल वागळे - गौतम राजाध्यक्षांबरोबर तू खूप काम केलंस. तुमच्यात नक्की काय चर्चा व्हायच्या ?मिकी कॉन्ट्रॅक्टर - गौतम राजाध्यक्ष हे पाथबे्रकर फोटोग्राफर होते. त्यांची लाइटिंग टेक्निक अशी होती, की हेवी मेकअपही नॅचरल दिसायचा. तो जितक्या प्रभावीपणे सॉफ्ट फोकस वापरायचा, त्यामुळे कितीही वाईट मेकअप असला तरी त्यांच्या कॅमेरातून तो चांगला वाटायचा. त्यांच्याबरोबर काम करताना मजा आली आणि मुख्य म्हणजे आमचं कॉम्बिनेशन हे इतकं हीट झालं की लोकांनी ते बदलायचा विचारही केला नाही.निखिल वागळे - नॅचरल मेकअप हे तुझ्या मेकअपचं एक वैशिष्ट्य आहे. पण मेकअप करताना तु नेमका काय विचार करतो ? म्हणजे माधुरी दीक्षित किंवा ऐश्वर्याचा मेकअप तू करत असशील, तर तू नेमकं काय करतोस ?मिकी कॉन्ट्रॅक्टर - मी हिरॉइन्सची पर्सनॅलिटी बदलत नाही. माधुरी ही माधुरीसारखीच दिसली पाहिजे, प्रियांका चोप्रा प्रियांकासारखीच दिसली पाहिजे, याची मी काळजी घेतो. 1980 च्या सुमारास सगळ्या हिरॉइन्स जवळपास सारख्याच दिसायच्या. डिंपल कपाडियानी एक हेअर स्टाइल केली आणि त्यात ती इतकी छान दिसली, की सगळ्या हिरॉइन्सनी त्याच हेअरड्रेसरकडून तशीच हेअरस्टाइल करून घेतली. हे चित्र बदलण्याचा मी प्रयत्न केला.निखिल वागळे - बेखुदी हा तुझा लीड मेकअप आर्टिस्ट म्हणून पहिला चित्रपट होता. त्याचा अनुभव कसा होता ?मिकी कॉन्ट्रॅक्टर - या चित्रपटाचा डायरेक्टर होता राहुल रवैल. त्याच्याविषयी मी बर्‍याच गोष्टी ऐकल्या होत्या. तो पैसे देत नाही, सगळ्यांसमोर अपमान करतो वगैरै वगैरे. त्याने जेव्हा मला विचारलं तेव्हा मी त्याला स्पष्ट सांगितलं की मी हे असं तुझ्याबद्दल ऐकलं आहे. मला इतके इतके पैसे हवेत, आणि तू मला वाट्टेल तसं बोललास तर मी तुझ्याच शब्दांत तुला उत्तर देईन. तो म्हणला चालेल. मग आम्ही काम सुरू केलं. तो पहिला चित्रपट होता, ज्यात मी डायरेक्टरबरोबर स्क्रिप्टवर चर्चा केली. म्हणजे सीन नं 19 असा असेल, तर कन्ट्युनिटी रहावी म्हणून त्याआधीच्या सीनला मेकअप कसा असावा वगैरे वगैरे. माझ्या मते फिल्म इंडस्ट्रीत पहिल्यांदाच ही पद्धत मी सुरू केली, आणि पुढे बर्‍याच लोकांनी ती स्वीकारली.तू खूप वेगवेगळ्या डायरेक्टर्सबरोबर काम केलं आहेस. त्याविषयीच्या अनुभवांविषयी काय सांगशील ?मिकी कॉन्ट्रॅक्टर - प्रत्येकाबरोबरचा अनुभव हा खूप वेगळा आणि लक्षात रहाण्यासारखा आहे. करणचा पहिला चित्रपट मी केला, तेव्हा मी त्याला ओळखतंही नव्हतो. पण पहिल्या भेटीत मला तो खूप प्रामाणिक वाटला. करण अगदी सहजपणे आपली स्क्रिप्ट देतो. करण जे नरेशन देतो, ते इतकं छान असतं, की ते ऐकताना प्रत्यक्ष चित्रपट बघितल्यासारखं वाटतं. आदित्य चोप्राचाबरोबर काम करण्याचा अनुभवही करणसारखाच आहे. सुरज बडजात्यांना जेव्हा चित्रपटाच्या प्रमोशनसाठी फोटोशूट करायचा होता तेव्हाही त्याने मला पूर्ण स्क्रिप्ट ऐकवली. भाग्यश्रीला कसा लुक द्यायचा, हे मी ठरवू शकतो. पणस्क्रिप्ट ऐकल्यावर नेमका कसा मेकअप हवा आहे , हे मी जास्त चांगल्या प्रकारे ठरवू शकतो , याची जाणीव त्याला होती.निखिल वागळे - तू सांगतोयस ते सगळे नव्या काळातले डायरेक्टर आहेत. पण तू यश चोप्रांसारख्या जुन्या दिग्दर्शकाबरोबरही काम केलं आहेस. त्यांच्याबरोबरचा अनुभव कसा होता ?मिकी कॉन्ट्रॅक्टर - जुन्या काळातले त्यांचे चित्रपट वेगळे होते, आत्ताचे वेगळे आहे. ते काळाप्रमाणे बदलत गेले. ' दिल तो पागल हैं ' सारखा चित्रपट हा आजच्या काळातला ताजा चित्रपट आहे. कोणत्याही वयोगटातल्या माणसांबरोबर ते खूप चांगल्या प्रकारे चर्चा करू शकतात. माझ्या मते हेच त्यांच्या यशाचं रहस्य आहे. निखिल वागळे - तू खूप सार्‍या हिरॉइन्सबरोबर काम केलं आहेस. त्यातला तुझा सर्वात आवडता चेहरा कोणता आहे ?मिकी कॉन्ट्रॅक्टर - मला वाटतंय या प्रश्नामुळे मला मार पडणार आहे. मी आधीही सांगितलय, आत्ताही सांगतोय, प्रत्येक चेहरा हा आपल्या जागी सुंदर आहे. पण त्यातही माझ्या मते ऐश्वर्याचा चेहरा सगळ्यात सुंदर आहे. एश्वर्याचा चेहरा हा एखाद्या सुंदर कॅन्व्हाससारखा आहे. त्यावर काहीही केलं तरी ते चांगलच दिसतं. आणखी एक चेहरा म्हणजे हेमा मालिनीचा. मला लहानपणापासून त्यांचा चेहरा खूप आवडायचा. त्यांना पहिल्यांदा जेव्हा मी मेकअप केला, तेव्हा मी अक्षरश: त्यांच्याकडे बघतच राहिलो. आजही त्यांना मेकअप करताना कित्येक वेळा माझी अशीच अवस्था असते. त्यांना मेकअप करताना आयुष्यात पहिल्यांदा माझा हात थरथरला होता. असाच आणखी एक चेहरा म्हणजे आशा भोसले. मुळात त्यांना आधी माझ्यावर विश्वासच नव्हता. त्या सरळ सांगायच्या की मी गायिका आहे, अभिनेत्री नाही, तेव्हा जास्तं मेकअप करायचा नाही. पण नंतर नंतर त्यांनाही कळलं की कॅमेरासमोर उभं रहाताना जरा जास्त मेकअप लागतोच. त्यांच्या गळ्यावर जेव्हा मी मेकअप केला, तेव्हा परत एकदा माझा हात थरथरला. म्हणजे ज्या गळ्यातून एक से एक सुरेल गाणी बाहर पडली, त्या गळ्याला मेकअप लावताना मी भारवून गेलो होतो. प्रत्यक्ष हेलनला मेकअप करतानाही माझा हात थरथरला नाही, पण आशा भोसले आणि हेमा मालिनीला मेकअप करताना माझा हात थरथरला.निखिल वागळे - असं म्हणतात माधुरी तुझी फेव्हरेट अ‍ॅक्टर आहे. तिचा मेकअप करताना तू जान लावतोस. तिच्याबद्दल काय सांगशील ?मिकी कॉन्ट्रॅक्टर - मी प्रत्येक मेकअपला जान ओततो. तिच्यासाठी मी काही स्पेशल वगैरे करत नाही. पण माधुरी जेव्हा येते, तेव्हा तिच्या डोक्यात काही कन्सेप्शन्स नसतात. ती सगळं माझ्यावर सोपवून मोकळी होते. मग माझी जबाबदारी वाढते. म्हणजे दर वेळेस काहीतरी वेगळं आणि चांगलं करणं त्यामुळे मला शक्य होतं. तिचा माझ्यावर एवढा विश्वास होता की एकदा सेटवर डायरेक्टरनी मला सांगितलं की माधुरीला आरसा दाखव, तेव्हा ती म्हटंली मिकी जर मेकअपला असेल तर मला आरशाची गरजच नाही. माझ्या मुलीची मी जेवढी काळजी घेईन, तेवढीच तिची घेतो.निखिल वागळे - म्हणजे तू ज्याचा मेकअप करतोस, त्या व्यक्तीचं तुझ्याबरोबर चांगलं ट्युनिंग असेल तर त्याचा मेकअप जास्त चांगला होतो ?मिकी कॉन्ट्रॅक्टर - असं काही नाही. उलट एखादी ओळखीची व्यक्ती असेल, तर पटकन तिला सांगता येत नाहीत की हे तुला चांगलं दिसत नाही किंवा या मेकअपमध्ये तू वाईट दिसतेस. पण एखाद्या अनोळोखी माणसाला हे पटकन सांगता येततं. अर्थात जर आमचे संबंध खूप चांगले असतील, तर तिला सुचना देणं जास्त सोपं जातं. निखिल वागळे -मिकी कॉन्ट्रॅक्टर कधी पुरुषांना मेकअप का करत नाही?मिकी कॉन्ट्रॅक्टर - माझं म्हणणं असं आहे की पुरुषांना मेकअप लावून काय करणार ? म्हणजे ऑन स्क्रीन ते दाढी मेकअप लावून दिसणार. त्याचा काय उपयोग. दुसरीगोष्ट मला पुरुषांनी मेकअप लावलेला आवडत नाही. कारण हल्ली लेन्सेस इतक्या शार्प आहेत की सगळं दिसतं. आणि पुरुषांना मेकअप केला असेल तर ते फार विचित्र दिसतं. आणखी एक गोष्ट म्हणजे पुरुषांना मेकअप लावताना मी फार तर थोडसं फाउंडेशन लावून टचअप करेन. मग एवढ्याशा कामाचे मला किती पैसे मिळणार ? एक सजवलेली बाई फार छान दिसते, पण सजवलेला पुरुष कसा दिसेल ? अर्थात एखाद्या टीव्ही शोमध्ये मी थोडंसं टचअप करतो. पण मला स्पष्ट सांगावसं वाटतं की त्यामुळे पुरुषांच्या चेहर्‍यात फारसा फरक पडत नाही.निखिल वागळे -आत्तापर्यंत तू दोन पुरुषांना मेकअप केला आहेस. एक अनुपम खेर आणि दुसरा आमीर खान. त्याविषयी काय सांगशील ?मिकी कॉन्ट्रॅक्टर - आम्ही सिने प्लेसची एडिटर रीटा मेहता हिच्याबरोबर एप्रिल फूल कव्हरसाठी शूट करायचं ठरवलं. आधी सगळे हो म्हणले, पण एक दिवस आधी सगळ्यांनी बॅक आउट केलं. अनुपम एकटा तयार झाला. त्यामागे खूप मोठी योजना नव्हती. आणि ते कव्हर जाम हीट झालं. कारण कोणी त्याला ओळखलंच नाही. आमीरचा मेकअप करायचं ठरलं तेव्हा तो माझ्याकडे आला आमि त्यानी सांगितलं की माझी बॉडी बघ आणि ठरव की तू काय करणार आहेस. तो, मी आणि कॉश्च्युम मॅनेजरनं बराच वेळ चर्चा केली. आम्ही ठरवलं की आत्तापर्यंत कोणी न केलेली गोष्ट आम्ही केली. आम्ही त्याला अप हेअर विग दिला. त्याची छाती आणि पाय पूर्ण वॅक्स केले. आणि आम्ही टेपिंगही केलं होतं. जहिल्या दिवशी जेव्हा आम्ही ते टेप काढले, तेव्हा अक्षरश: त्याची स्कीन सोलवटली गेली. पण आमीर एवढा परफेक्शनिस्ट आहे की दुसर्‍या दिवशी त्याने एक शब्दंही न बोलता त्याच जखमेवर टेपिंग करून घेतलं.निखिल वागळे -मेकअप आर्टिस्टला प्रतिष्ठा मिळावी म्हणून तू खूप झगडला आहेस. तो अनुभव कसा होता ?मिकी कॉन्ट्रॅक्टर - झगडलो म्हणजे मी काही कोणाकडे जाऊन आरडाओरड केला नाही. मी एवढंच सांगितलं की मला इतके इतके पैसे हवेत, मला स्लेव्हसारखं वागवलेलं आवडणार नाही. आणि काही छोट्या छोट्या गेष्टी होत्या की मी इकॉनॉमी क्लासमधून प्रवास करणार नाही किंवा मला माझी रुम शेअर करायला आवडत नाही, तेव्हा मला वेगळी रुम द्या, या मागायला मी सुरुवात केली. आणि जर प्रोड्युसर एवढे पैसे खर्च करायची तयारी असेल मी काम करेन. आणि माझं बघून इतरांनीही असे पर्क्स मागायला सुरुवात केली. माझ्याएवढा नाही, तरी त्याचा फायदा सगळ्यांनाच झाला.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading