करणार Videos in Marathi

Showing of 651 - 664 from 742 results
2014 च्या निवडणुकीआधी दिल्लीत उपोषण करणार - अण्णा

बातम्याApr 27, 2012

2014 च्या निवडणुकीआधी दिल्लीत उपोषण करणार - अण्णा

27 एप्रिल2014 च्या लोकसभा निवडणुकीआधी पुन्हा एकदा रामलीला मैदानावर उपोषण करणार असल्याचं जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी जाहीर केलं. तसेच राज्यात कॅगच्या अहवालात राज्यातील 10 आजी माजी मंत्र्यांवर आणि संस्थांवर ठपका ठेवण्यात आला आहे. या मंत्र्यांवर कारवाई करण्याची मागणी अण्णांनी केली. भ्रष्टमंत्र्यांना जन्मठेप द्यावी अशी मागणीही अण्णांनी केली आहे. आयबीएन-लोकमतचे संपादक निखिल वागळे यांना दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत अण्णांनी ही मागणी केली. अण्णा हजारे आणि बाबा रामदेव यांनी जनलोकपाल विधेयक, काळा पैसा आणि लोकायुक्तसाठी जनजागृती अभियान राबवणार आहे यासाठी अण्णा हजारे 1 मे पासून राज्यात दौरा करणार आहे.