News18 Lokmat

#करणार

Showing of 638 - 651 from 680 results
ग्रेट भेटमध्ये विनोद कांबळी (भाग - 2 )

May 13, 2013

ग्रेट भेटमध्ये विनोद कांबळी (भाग - 2 )

ग्रेट भेटमध्ये विनोद कांबळीशी मारलेल्या गप्पांचा पुढचा भाग - निखिल वागळे : पहिल्या दहा इंटरनॅशनल मॅचेसमध्ये तू हजार पेक्षा जास्त रन्स् केले होतेस. आणि त्यावेळेचं तुझं ऍव्हरेज हे ब्रॅन्डमनपेक्षाही चांगलं होतं. हाही रेकॉर्ड सचिनच्या नावावर नाही आहे. 1991 पासून तू एवढा चांगला खेळत असताना 1995 ला टीमच्या बाहेर फेकला गेलास. असं का झालं ? विनोद कांबळी : हो. हे असं का झालं ते मला कळायला मार्ग नाही. पण मला वेस्ट इंडिजची टेस्ट सिरीज एकदमच खराब गेली होती. कारण त्या सिरिजच्या आधी न्यूझिलंडमध्ये असताना माझा ऍवरेज हा 115 चा होता. आणि तोही 10 टेस्ट मॅचेसचा. माझा ऍवरेजपाहून न्यूझिलंडचे खेळाडूही एकदम चकीत पडले होते. पण त्याच्यानंतरची सिरीज मला एकदमच खराब गेली होती. असं अचानक का झालं ते कळायला मार्ग नाही. निखिल वागळे : विनोद माझ्याकडे तुझं स्टॅटिस्टिक आहे. 17 टेस्टमध्ये तुझ्या चार सेन्च्युरीज आहेत आणि दोन डबल सेंच्युअरीज आहेत. एवढा चांगला परफॉर्मन्स असताना तुला टीममधून का बाहेर काढलं गेलं ? केवळ परफॉर्मन्स म्हणून की यापाठी काही राजकारण होतं ? विनोद कांबळी : आता काय होतं हेच मला कळत नव्हतं. कारण कुठलाही सिलेक्टर कधी अशी कारणं देत नाही. निखिल वागळे : विनोद तुझा स्वभाव... तुझी कोणाची दुश्मनी होती... विनोद कांबळी : माझी कसली दुश्मनी. माझा स्वभाव हा असा खेळकर आणि ओपन माईन्डेड आहे. माझ्या हातून भले चूक झाली असेलही... कळत - नकळत मी कोणाला दुखावलंही असेन...पण माझा तसा स्वभाव नाही कुणावर राग धरायचा, जळायचं, खाली खेचायचं. मला नऊ वेळा ड्रॉप केलं. नऊही वेळा मी माझ्या चाहत्यांच्या प्रेमानं खंबीरपणं उठून उभा राहिलोय. मला पहिल्यांदा शारजा टूर नंतर ड्रॉ केलं. शारजामध्ये माझा परफॉर्मन्स चांगला असूनही मला ऑस्ट्रेलिया टूरसाठी डावललं गेलं. कारण काय तर मी बाऊचर ट्रॅकवर नीट खेळलो नाही. मी बाऊचर ट्रॅकवर गेलोच नाही, मला उभं केलं गेलंच नाही तर मी खेळणार तरी काय आणि कुठून ? असं मला नऊ वेळा ड्रॉप केलं आणि कारण काय तर इनडिसिप्लीन. निखिल वागळे : पण विनोद मी तुला आता सरळच विचारतो तू काहीतरी अझरची खोडी काढलीस आणि अझर तुझ्यावर रागवला म्हणून हे असं झालं. विनोद कांबळी : नाही. अझर माझा चांगला मित्र आहे. तो अजूनही माझ्या चांगलाच संपर्कात आहे. कपिल देवपासून ते अजित वाडेकर या सगळ्यांशी माझे रिलेशन खूप चांगले होते. आता त्या लोकांचं माझ्याबद्दलचं मत काय आहे हे मला ठाऊक नाही. एखाद्या प्लेअरला घेणं न घेणं यात कॅप्टनचा होकार असतोच की. पण मला वाटत नाही अझर असं करेल. पण निवड समितीच्या लोकांचं काहीतरी कर्तव्य आहे की नाही. मला नेहमी बेशिस्तीचं कारण दाखवून बाजूला केलं गेलं. मी कुठे चुकलो हे सांगण्यास त्यांनी नकार दिला. निखिल वागळे : बेशिस्त म्हणजे काय ? तू रात्री पाटर्‌यांना जायचास ? डान्स करायचास ? तू रात्री पबमध्ये जायचास ? विनोद कांबळी : हो. मी रात्री पाटर्‌यांना जायचो, डान्स करायचो, पबमध्ये जायचो. पण मी हे लपून छपून केलं नाही. काही लोकं तर लपून छपून सगळं करायचे. आणि का जाऊ नये. रिलॅक्सिंगचा काही आम्हाला पर्याय नको का. आणि आता तर सगळेच प्लेअर खुलेआम जातात. निखिल वागळे : पण तुला हे बेशिस्त आहे, असं वाटत नाही ? विनोद कांबळी : नाही. कारण टीममध्ये घेताना माझ्यासमोर कोणतीच नियमावली ठेवली नव्हती. मी चुकत आहे, त्यांनी मला तसं सांगावं. मी स्वत:ला सुधारलं असतं. निखिल वागळे : तू सिद्धूला मारायाही धावला होतास म्हणे ? असं मी ऐकलं आहे ? सिद्धूचं आणि तुझं काही वैर होतं का ? विनोद कांबळी : नाही असं काही नाहीये. सिद्धूचं आणि माझं तसं काही नव्हतं. मी आऊट झाल्यावर मला खूप राग यायचा. मी रागानं बॅट येऊन फेकायचो. नंतर मग सरांना कळलं. ते म्हणाले की तुझी बॅट तुझा देव आहे. तिचा असा अपमान करू नकोस. असंच एकदा सिद्धूच्या जवळून ती पास झाली. त्यामुळे तो रागावला. आणि कोणाचंही रागावणं स्वाभाविकच आहे. मी मुद्दामहून कधी कोणाला दुखावलं नाही. अजाणतेपणी होतं असं. निखिल वागळे : पण तुला असं वाटतं का, की या सगळ्याचा परिणाम तुझ्या क्रिकेटवर झाला आणि तुला त्यामुळे बाहेर पडावं लागलं ? विनोद कांबळी : नाही. असं नाहीये. मी तुम्हाला इथं एक उदाहरण देऊ इच्छितो. की आपल्याकडे लहान मुलं असतात. ती चुकतात. पण आई-चडील कधी त्या मुलांना रस्त्यावर टाकत नाही. तर सुधारतात.असंच आमची क्रिकेट असोसिएशन ही आमची आई आहे. आम्ही तिची लेकरं आहोत. एखादा खेळाडू चुकत असेल तर त्याला सुधारणं हे असोसिएशनचं काम आहे. लांब कशाला जाता. आपण रिकी पाँटिंगचं उदारण घेऊ. त्यानं तर पबमध्ये जाऊन गोंधळ घातला होता. मी तसं तर नाही केलं. पण रिकीला एसीबीनं समज दिली. रिकी सुधारला. नुसताच सुधारला नाही. तर त्याचा पर फॉर्मन्सही सुधारला. स्टिव्ह वॉ रिटायर्ड झाला तशी कॅप्टनशीप त्यानं चांगली सांभाळली. तसं माझ्याबाबतीत झालं नाही. निखिल वागळे : तुला असं वाटतं की तुला सुधारण्याची कोणी संधी दिली नाही. तुला कोणी सुधारलं नाही... विनोद कांबळी : हो. माझ्याबाबतीत तसं झालंच नाही. मला कोणी सांगितलंच नाही ना. निखिल वागळे : तू कधी तरी असं म्हणाला होतास की, सचिनला सांभाळायला त्याचा भाऊ अजित होता. मला सावरायला कुणीच नव्हतं. हे खरं आहे का ? विनोद कांबळी : हो, ते खरंय. आणि मी तसं मान्य करतो. सचिनला सांभाळायला त्याचे बाबा होते, भाऊ होता. पण मला मात्र कुणी नव्हतं. सगळे होते ते माझ्या कांबळी या वलयाला आकर्षून माझ्या आजुबाजुला वावरायचं. आणि हे मला कळलं होतं, तेव्हा वेळ निघून गेला होता. क्रिकेटनं मला खूप काही शिकवलं. मला सगळ्यांनी दगा दिला. पण मी सगळ्यांना माफ केलं. निखिल वागळे : मला सांग अजितसारखा मोठा भाऊ असला असता आणि सचिनच्या बाबांसारखे बाबा तुला लाभले असते तर खूप फरक पडला असता का ? विनोद कांबळी : हो. पुष्कळ. तुमची जडणघडण, तुम्हाला जो कौटुंबिक आधार मिळतो तो फार मोठा असतो. मला सांभाळणारं असं कुणीच नव्हतं. मी धडपडत, ठेचाळत स्वत:च्या पायावर उभा राहिलो आहे. आई-वडील म्हणाल तर त्यांना इतर भावंडांकडे लक्ष द्यावं लागायचं. त्यामुळे माझ्यावर लक्ष द्यायला फारसा वेळ मिळायचा नाही. निखिल वागळे : पण मग तुला कधी तुझं मन कोणाकडे मोकळं करावं, असं वाटलं नाही का ? म्हणजे कोणाला मोठा भाऊ मानावं, वडीलकीच्या नाम्त्यानं कोणाकडे मोकळं करावं, असं वाटलं नाही का ? विनोद कांबळी : तसा प्रयत्न केला होता. पण तेच दगाबाज निघाले. म्हणून माझा त्यावर विश्वास नव्हता. मला कोणतीही अडचण आली त्यात्या वेळी मी सचिनचा सल्ला घेतलेला आहे. आणि जेव्हा नाही त्यावेळेला फटका बसला आहे. आतापर्यंतही मी सचिनशी बोलत आहे. तो माझा गाईड आहे. फिलॉसोफर आहे. मात्र एक खरं अजितसारखा भाऊ जर मला लाभला असता तर आज ज्याजागी सचिन आहे, त्याजागी मी असलो असतो. निखिल वागळे : वाईट वाटतं का रे ? विनोद कांबळी : हो. पण आता काय करणार. माझ्यात अजूनही भरपूर क्रिकेट शिल्लक आहे. नऊवेळा मी कमबॅक केलं ते माझ्या फॅन्सच्या जीवावरच नाही का. माझ्याजागी जर दुसरा तिसरा कोणी असता तर तो फ्रस्टेट होऊन निवृत्त होऊन घरी बसला असता. निखिल वागळे : तुझ्यातल्या क्रिकेटला तेवढा न्याय मिळाला नाही का ? विनोद कांबळी : हो. अगदी. अगदी. निखिल वागळे : तुला पश्चात्ताप होतोय का? विनोद कांबळी : पश्चात्ताप नाही. पण वाईट खूप वाटतं. कारण माझ्या फॅन्सना मी खूप काही दिलं असतं. निखिल वागळे : तुला असं वाटतं का की, आयुष्यहे एकदाच मिळतं. तेव्हाच करायचं असतं. संधी पुन्हा पुन्हा येत नाही ? विनोद कांबळी : संधी मिळाली तर सोडाच का. ज्याज्या वेळेला मला अपॉरच्युनिटी मिळाली आहे. त्यात्या वेळेला मीती ग्रॅब केली आहे. निखिल वागळे : नव्या मुलांना हे सांगणार का ? विनोद कांबळी : होय. मी नक्की सांगणार. कारण सचिन तेंडुलकर काय किंवा विनोद कांबळी हे एका रात्री घडले नाहीयत. तर त्यांच्यामागे भरपूर परिश्रम आहेत. कष्ट आहेत. ते किंवा त्याहून जास्त त्यांनी केलेच पाहिजे. आणि त्या दोघांपेक्षाही अव्वल झालंच पाहिजे.