#कन्नड

Showing of 209 - 222 from 233 results
बेळगावात मराठी भाषिकांच्या घरावर दगडफेक

बातम्याNov 3, 2009

बेळगावात मराठी भाषिकांच्या घरावर दगडफेक

3 नोव्हेंबर बेळगावात मराठी भाषिकांवरच्या अत्याचाराची आणखी एक घटना समोर आली आहे. कनबरगी इथं कन्नड वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी मराठी भाषिकांच्या घरावर दगडफेक केली. आणि मराठी पाट्यांची तोडफोड केली. फलकांवरचे भगवे झेंडेही त्यांनी काढून घेतले. दरम्यान, कलखांब या गावात एकीकरण समितीच्या 5 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर खुनाचा प्रयत्न करणं तसंच जातीवाचक शिवीगाळ करण्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मराठीबहुल बेळगाव आणि इतर सीमाभागात मराठी भाषिक 1 नोव्हेंबर हा 'काळादीन' म्हणून पाळतात. कारण याच दिवशी जबरदस्तीनं हा सीमाभाग कर्नाटकमध्ये सामील करण्यात आला होता. तर 1 नोव्हेंबर 1956 या दिवशीच कर्नाटक राज्य अस्तित्वात आल्यानं कन्नड भाषिक राज्योत्सव साजरा करतात. या दिवसाच्या निमित्तानं दोन्ही भाषिक गावागावांत आपापले ध्वज लावतात. हे ध्वज लावण्यावरूनच दोन्ही गटांमध्ये बाचाबाची झाली. त्याचंच निमित्त साधून या मराठी भाषिक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.