औषधे

Showing of 40 - 52 from 52 results
अ ॅलोपथी औषध बंदीविरोधात डॉक्टरांचा मोर्चा

बातम्याJul 10, 2012

अ ॅलोपथी औषध बंदीविरोधात डॉक्टरांचा मोर्चा

10 जुलैजनरल प्रॅक्टिशनर्स आणि फॅमिली फिजीशिअन्स या डॉक्टर्सना ऍलोपथी औषधे वापरण्यास बंदी घालण्याच्या निर्णयाविरोधात पुण्यात डॉक्टर्स रस्त्यावर उतरले. होमिओपथी, ऍलोपथी, आयुर्वेद, आणि युनानी डॉक्टरांनी आज 10 जुलै रोजी राज्यव्यापी बंद पुकारला आहे. क्लिनिकल एस्ट्ॅब्लिशमेंट ऍक्टमुळेही डॉक्टर्स वैतागले आहेत. त्याचबरोबर सर्व डॉक्टर्सना मिश्र औषधप्रणाली वापरण्यास द्यावी. डॉक्टरांकरीता योग्य अभ्यासक्रम सुरू करावा अशा मागण्या यावेळी करण्यात आल्यात. पुण्यात शनिवारवाडयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी डॉक्टर्सनी स्त्री भ्रूण हत्येविरोधी सामुहिक शपथही घेतली.