#औरंगाबाद

Showing of 2081 - 2094 from 2162 results
'तें दिवस' वाचकांच्या भेटीला

बातम्याMay 19, 2009

'तें दिवस' वाचकांच्या भेटीला

19 मे, विजय तेंडुलकरांचा पहिला स्मृतीदिन. त्यांच्या पहिल्या स्मृतीदिनाचं औचित्य साधून तेंडुलकरांनी अखेरच्या दिवसात केलेलं लिखाण वाचकांच्या भेटीला येत आहे. राजहंस प्रकाशनातर्फे 'तें दिवस' या नावानं हे लिखाण पुस्तक रुपानं एकाच वेळी पुणे नागपूर आणि औरंगाबाद या तीन शहरांमध्ये प्रकाशीत केलं जात आहे.या पुस्तकातले शब्द आणि सगळंच लिखाण म्हणजे तेंडुलकरांचं शेवटचं लिखाण आहे. त्यांच्या अखेरच्या दिवसांमध्ये आजारी असताना त्यांनी केलेलं हे लिखाण आता पुस्तक रुपाने प्रकाशीत होतंय. हे पुस्तक म्हणजे तेंडुलकरांनी त्यांच्या चष्म्यातनं पाहिलेलं त्यांचं स्वत:चं आयुष्य आहे. हे पुस्तक म्हणजे त्यांचा गिरगाव चाळीतला जन्म, त्यांनी वडिलांच्या कडेवर बसून पाहिलेल्या तालमी, कोल्हापुर आणि पुण्यातलं त्यांचं वास्तव्य, स्वातंत्र्यप्राप्ती, 42च्या लढ्यातला धरपकडीचा अनुभव अशा सगळ्या घटनांचा तेंडुलकरी शैलीतला आढावा यामध्ये आहे. तेंडुलकर त्यांच्या शेवटच्या काळात पुण्याच्या प्रयाग हॉस्पीटलमध्ये होते. या दरम्यानच त्यांनी हे लिखाण केलंय. त्यांच्यावर उपचार करणारे डॉ. शिरीष प्रयाग यांनी तेंडुलकरांच्या अखेरच्या दिवसातील आठवणींना 'तें दिवस'च्या माध्यमातून उजाळा दिला आहे. तेंडुलकरांना आपल्यातून जाऊन एक वर्ष पूर्ण होतंय. तरीही साहित्यातल्या या दिग्गजाच्या आठवणी त्यांच्या या लिखाणातून चिरंतन राहणार आहेत हे मात्र नक्की.