#ओले कपडे

VIDEO : 'आधी खूप भीती वाटली,पण हिंमत केली'!

बातम्याAug 22, 2018

VIDEO : 'आधी खूप भीती वाटली,पण हिंमत केली'!

मुंबई, 22 आॅगस्ट : मुंबईतील परळ भागात क्रिस्टल टॉवरला लागलेल्या भीषण आगीत चार जणांचा मृत्यू झाला आहे. आगीत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात अग्नीशमन दलाच्या जवानांना यश आलं आहे. अनेकदा आपतकालीन स्थितीत योग्य प्रशिक्षण देऊनही लोक घाबरून न करायच्या गोष्टी करुन जातात. मात्र याला अपवाद ठरली १० वर्षांची झेन. झेनने तिच्या कुटुंबासह ८ जणांचे प्राण वाचवले. आज बकरी ईद असल्यामुळे झेनला शाळेला सुट्टी होती तर तिचे आई- बाबाही घरी होते. आई बाथरूममध्ये गेली असता तिला खिडकीतून धूर येताना दिसला. आईने याबद्दल झेनच्या वडिलांना सांगितले. मात्र वडिलांनी या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. थोड्याच वेळात इमारतीच्या १२ व्या मजल्यावर आग लागल्याचे त्यांना कळले. झेनच्या आई- वडिलांनी झोपलेल्या झेनला उठवले आणि स्वयंपाक घरात नेले. आपण आता अडकलो या विचारानेच झेनचे आई-वडील घाबरले. मात्र घाबरून न जाता झेनने हाताला लागतील ते सर्व कपडे आई- बाबांना पाण्यात भिजवायला सांगितले. भिजलेले कपडे अंगावर ओढून घेऊन केसांवर सतत पाणी ओतण्यास सांगितले. तसेच गुदमरून श्वास कोंडू नये यासाठी तिने ओला कपडा नाकावर धरायला सांगितला. यानंतर घाबरून न जाता सर्वांना खाली बसून राहायला सांगितले.आग लागल्यावर तोंडावर ओला कपडा घ्यावा, अंगावर ओले कपडे घ्यावे तसेच डोक्यावर सतत थंड पाणी मारत राहिल्यावर माणूस पॅनिक होत नाही तर तो शांत राहतो. या शाळेत शिकलेल्या गोष्टी झेनने खऱ्या आयुष्यात वापरत अनेकांचे प्राण वाचवले. झेनने सांगितलेल्या गोष्टी इतरांनी ऐकल्यामुळे मोठा अनर्थ टळला. झेनच्या या प्रसंगावधनाने थोड्याच वेळात अग्निशमन दलाच्या जवानांनी या कुटुंबाची आणि इतर सदस्यांची सुटका केली. झेनच्या प्रसंगावधनाने कित्येक लोकांचे प्राण वाचले.

Live TV

News18 Lokmat
close