ऑस्ट्रेलिया

Showing of 885 - 898 from 911 results
श्रीलंकन टीमवर दहशतवादी हल्ला

बातम्याMar 3, 2009

श्रीलंकन टीमवर दहशतवादी हल्ला

3 मार्च, लाहोरश्रीलंकन क्रिकेट टीमवर लाहोरच्या लिबर्टी पार्क परिसरात गोळीबार झाला . हा गोळीबार लाहोर इथल्या गडाफी स्टेडियमच्या बाहेर झाला. गोळीबारात सहा श्रीलंकन खेळाडू जखमी झालेत तर 6 पोलिसांना प्राण गमवावे लागलेत. दरम्यान श्रीलंका - पाकिस्तान दरम्यानची मॅच रद्द करण्यात आली आहे. गोळीबार करून हल्लेखोर फरार झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. या हल्ल्यामुळं श्रीलंका - पाकिस्तान दौरा रद्द करण्यात आला आहे. दुस-या टेस्टसाठी श्रीलंकन टीम स्टेडियममध्ये जात असताना हा हल्ला करण्यात आला. दहशतवादी रिक्षामधून आले होते. श्रीलंकन टीमची बस स्टेडियमजवळ आल्यावर दहशतवाद्यांनी अचानक गोळीबार आणि ग्रेनेडचा हल्ला सुरू केला. या हल्ल्यात चामिंडा वास, संगकारा, मेंडीस, समरवीरा आणि तुषारा जखमी झाले असून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.श्रीलंका-पाकिस्तानदरम्यानच्या टेस्टचा तिसरा दिवस होता. 606 रन्सचा डोंगर रचल्यानं श्रीलंकेच्या गोटात आनंदाचं वातावरण होतं. मैदानावर पाकिस्तानविरुध्द कशी रणनिती आखायची याच्या विचारातच श्रीलंकेची टीम होती आणि त्याचवेळी बाहेर या टीमविरुध्द रचला जात होता एक भयानक कट.काहीतरी अघटीत घडणार याची पुसटशी कल्पनाही नसलेली श्रीलंकेची टीम खास बसनं हॉटेलपासून गदाफी स्टेडिअमच्या दिशेनं निघाली. बसच्या चारी बाजूनं कडक सुरक्षा व्यवस्था होती. वेळ सकाळी नऊची होती. खेळाडूंना घेऊन चाललेली बस शहराच्या मध्यवर्ती असलेल्या लिबर्टी चौकात पोहचली आणि काही कळायच्या आतच बसवर अंदाधुंद गोळीबार सुरू झाला. आधीच दबा धरुन बसलेल्या दहा ते बारा दहशतवाद्यांनी सुरक्षा कवच भेदून श्रीलंकेच्या खेळाडूंना टार्गेट केलं. बसवर ग्रेनेड हल्लाही करण्यात आला आणि जवळपास दोन ते तीन मिनिटं हा गोळीबार सुरूच राहिला.श्रीलंकेचे थिलान समरवीरा, कुमार संगकारा, अजंथा मेंडीस, महेला जयवर्धने, थरंगा परनविथना आणि चामिंडा वास हे प्रमुख खेळाडू गोळीबारात जखमी झाले. यानंतर दहशतवाद्यांनी मोर्चा पोलिस व्हॅनकडे वळवला, खेळाडूंच्या रक्षणासाठी असलेल्या पोलिसांवर त्यांनी बेछुट गोळीबार केला. पोलिसांनीही या हल्ल्याला उत्तर दिलं. पण 7 पोलिसांना आपला प्राण गमवावा लागला. दहशतवादी इथंच थांबले नाहीत. अंपायरला घेऊन चाललेल्या व्हॅनवरही त्यांनी हल्ला चढवला.गडाफी स्टेडियमवर येणारा श्रीलंकन टीमचा मार्गही आज बदलण्यात आला होता. या हल्ल्यावरून दहशतवाद्यांना बदललेल्या मार्गाची माहिती होती, असं लक्षात आलं आहे. या हल्ल्यावरून दहशतवादाचा फटका हा आता खेळालाही बसायला लागला आहे. 1972 साली म्युनिक ऑलिम्पिकमध्ये दहशतवादाचा फटका खेळाला बसला होता. त्या म्युनिक ऑलिम्पिकमध्ये इस्रायली खेळाडूंना ओलीस ठेवलं होतं. तसाच काहीसा प्रकार गडाफी स्टेडियमकडे जाणा-या मार्गावर श्रीलंकन खेळाडूंच्या बाबतीत घडलाये.श्रीलंकन खेळाडूंवर हल्ला करणारे बारा अतिरेकी होते. या हल्ल्यासाठी दहशतवाद्यांनी जबरदस्त तयारी केली होती. बॉम्ब हॅन्डग्रेनेड रॉकेट लॉन्चर, या सगळ्यांच्या तयारीनिशी दहशतवादी आले होते. ते बारा अतिरेकी सकाळी 9.00 वाजता रिक्षातून आले होते. त्यांनी गडाफी स्टेडियमच्या बाहेर श्रीलंक क्रिकेट खेळाडूंच्या बसवर सर्वप्रथम गन फायरनं गोळ्या झाडण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी हॅन्ड ग्रेनेडचा वापर केला होता. पण फेकलेले हॅन्डग्रेनेड फुटले नाहीत. यावेळी काही बॉम्ब, .हॅन्डग्रेनेड पोलिसांच्या हाती लागले. ते निकामी करण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू झालं. दहशतवादी हल्ल्यात श्रीलंकेचे सर्व अनुभवी खेळाडू जखमी झाल्यामुळे तातडीनं हा दौरा रद्द करण्यात आला आहे.आता श्रीलंकन खेळाडू सुखरूप आहेत. श्रीलंकन खेळाडूंच्या सुरक्षेसाठी गडाफी स्टेडियमवर हेलिकॉप्टर मागवण्यात आलं. या हेलिकॅप्टरमध्ये पाकिस्तानी खेळाडूंना बसवून त्यांना कराची विमानतळावर पोहोचवण्यात आलं. त्यानंतर त्यांना आबुदाबीला रवाना करण्यात आलं. आबूधाबीकडनं श्रीलंकन क्रिकेटर कोलंबोला जायच्या तयारीत होते. या हल्ल्यात श्रीलंकेचे सहा खेळाडू जखमी झाले. या सहा खेळाडूंबरोबर श्रीलंकेचा असिसस्टंट कोच पॉल मेकॉकही जखमी झाला आहे. मात्र आता सगळे सुरक्षित आहेत. तसंच त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता करण्याचं कारण नसल्याचंही श्रीलंकेचा बॅट्समन सनथ जयसूर्यानं सांगितलंय.पाकिस्तानी क्रिकेटर आणि कॉमेन्ट्रेटर रमीज राजानं या घटनेचा निधेन ' दिल खून के आँसू रोता हैं , ' अशा शब्दात केला आहे. ' पाकिस्तानात ऍथलिस्ट, खेळाडूंना असं लक्ष्य केलं जाईल, हे माझ्या ध्यानीमनी नव्हतं. दहशतवादाच्या विरोधात एकत्र व्हायला पाहिजे. मी जसा गाडीतून उतरलो तसं मला गोळीबार आणि स्फोटांचे आवाज आले. श्रीलंकन खेळाडू लिबर्टीच्या गेटनं आत आले. तर मी फिरोजपूर गेटनं आत आलो. यात येऊन पाहतो तर काय ऍम्ब्युलन्सची सिच्युएशन निर्माण झाली होती. नंतर मला फोन आला की, तुम्ही जिथे आहात तिथेच रहा. समजा मी पुढे आलो असतो तर पुढे काय झालं असतं याची कल्पना करवत नाही, " अशी प्रतिक्रिया पाकिस्तानी क्रिकेटर रमीज राजानं दिली आहे. " पाकिस्तानात आता कुठे क्रिकेट पाहण्यासाठी देशी - परदेशी क्रीडा रसिक येत होते. पण या घटनेनं पाकिस्तानी क्रीडा रसिक येणार तरी कसे आणि पाक क्रिकेटचा विकास होणार तरी कसा, असा अशी प्रश्नार्थक खंत रमीज राजानं व्यक्त केलीये.बॉब वुल्मर यांच्या गूढ मृत्यूनंतरचा हा श्रीलंकन खेळाडूंवरचा हल्ला ही घडलेली घटना पाकिस्तान क्रिकेटसाठी नुकसानकारक आहे, असं पाकिस्तानचा कॅप्टन युनिस खान यानं म्हटलंय. पण, पाकच्या जवानांनी जीवाची पर्वा न करता श्रीलंकन खेळाडूंचं रक्षण केलं, हे खूप महत्त्वाचं असल्याचं तो म्हणाला. 'लाहोरमध्ये श्रीलंकन क्रिकेट टीमवर झालेल्या या दहशतवादी हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. या भ्याड हल्ल्याचा अवघ्या क्रिकेट जगतानं निषेध केलाय.जखमी झालेल्या 6 श्रीलंकन खेळाडूंच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी मी मनापासून ईश्‍वराकडे प्रार्थना करतो. तसेच या हल्ल्यात मृत झालेल्यांच्या कुटुंबीयांप्रति सहानुभूती व्यक्त करतो.मी श्रीलंका आणि पाकिस्तान या दोन्ही क्रिकेट बोर्डांशी चर्चा करून हा उर्वरित दौरा रद्द केलाय, ' अशी प्रतिक्रिया आयसीसीचे संचालक हरून लोगार्ट यांनी दिली. 'श्रीलंकन खेळाडूंवरील या हल्ल्याची आयसीसीनं गंभीर दखल घेतली आहे. भारतीय उपखंडात 2011 साली होणार्‍या वर्ल्ड कपचे सामने पाकिस्तानात होणार नाहीत, ' असंही आयसीसीचे संचालक हरून लोगार्ट म्हणाले.हा हल्ला लंकेच्या टीमवर नव्हता. तर पाकिस्तानच्या पोलिसांनाच अतिरेक्यांनी लक्ष्य केलं होतं, असं लंकेच्या टीमच्या बस ड्रायव्हर मेहेर करीमनं सांगितलंय.कोणत्याही खेळाचं यजमानपद पाकिस्तान भूषवू शकत नाही, हे दाखवून देण्याचा अतिरेक्यांचा हा प्रयत्न असल्याचं पाकिस्तानच्या माहिती मंत्री शेरी रहमान यांनी म्हटलंय.दहशतवादाचं हे सावट भारतावरही आहे. लाहोर शहर भारताच्या सीमेपासून फक्त 30 किलोमीटर दूर आहे. पंजाबच्या अमृतसर शहरापासून फक्त 50 किलोमीटर दूर आहे. त्यामुळं या हल्ल्याबाबत भारतानं चिंता व्यक्त केलीय. पाकिस्ताननं पोसलेल्या दहशतवादाचीच ही फळे आहेत, अशी प्रतिक्रिया केंद्रीय गृहमंत्री पी चिदंबरम यांनी दिलीय.दरम्यान, श्रीलंका टीमच्या या हल्ल्यानंतर आयपीएल स्पर्धांच्या सुरक्षेतही वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. सुरक्षेवरील ताण कमी करण्यासाठी आयपीएलच्या ह्या स्पर्धा लोकसभेच्या निवडणुकीनंतर घेण्यात येण्याची शक्यता आहे, अशी माहिती गृहमंत्रालयाच्या सूत्रांनी दिलीय. हल्ल्यामुळं क्रिकेट जगताला धक्का बसला आहे. क्रिकेटर्सनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. भारत आणि न्यूझीलंडच्या क्रिकेट टीम काळ्या फिती बांधून उतरले मैदानात उतरले होते.पाकिस्तानतल्या असुरक्षित परिस्थितीची पर्वा न करता श्रीलंकेच्या टीमनं इथं खेळण्याची हिम्मत दाखवली. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड अगद भारतानंही पाकिस्तानात खेळण्याचा नकार दिल्यानंतरही केवळ पाकिस्तानमधलं क्रिकेट जपण्यासाठी श्रीलंकेनं मदतीचा हात दिला होता. पण त्याचं फळ त्यांना हल्ल्यानं मिळालं. क्रिकेटच्या इतिहासात 3 मार्च 2009 हा दिवस काळा दिवस म्हणून नोंदवला जाईल.