#ऐतिहासिक

Showing of 1 - 14 from 86 results
VIDEO : नयनरम्य सोहळा : हजारो दिव्यांच्या प्रकाशात उजळला शनिवारवाडा

व्हिडिओNov 4, 2018

VIDEO : नयनरम्य सोहळा : हजारो दिव्यांच्या प्रकाशात उजळला शनिवारवाडा

पुणे, 4 नोव्हेंबर : हजारो दिव्यांच्या प्रकाशात पुण्यातल्या ऐतिहासिक शनिवारवाडा उजळून निघालाय. चैतन्य हास्य योग मंडळातर्फे रविवारी शनिवारवाड्याच्या प्रांगणात दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. या दीपोत्सवासाठी हजारो पणत्या प्रज्वलित करण्यात आल्या. यावेळी पणत्यांच्या माध्यमातून दिवाळीच्या शुभेच्छा संदेश आणि योगमुद्राही साकारण्यात आल्या. डोळ्याचं पारणं फोडणारा हा नयनरम्य सोहळा अनुभवण्यासाठी पुणेकरांनी गर्दी केली होती. दरवर्षी पुण्यात चैतन्य हास्य योग मंडळातर्फे ऐतिहासिक शनिवारवाडा प्रांगणात दीपोत्सव साजरा करण्यात येतो. ऐतिहासिक शनिवारवाड्यात आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्याला पुणेकरांचा भरभरून प्रतिसाद लाभला.

Live TV

News18 Lokmat
close