News18 Lokmat

#एस व्ही रोड

VIDEO : वायू चक्रीवादळाचा मुंबईत पहिला बळी, चर्चगेटवर वृद्धाचा मृत्यू

Jun 12, 2019

VIDEO : वायू चक्रीवादळाचा मुंबईत पहिला बळी, चर्चगेटवर वृद्धाचा मृत्यू

मुंबई, 12 जून : मुंबईत वायू चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे एकाचा मृत्यू झाला आहे. चर्चगेट रेल्वे स्थानकाजवळ होर्डिंग अंगावर पडून एका 62 वर्षीय पादचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. दुपारी एकच्या सुमारास दुर्घटना घडली. यामध्ये मधुकर नार्वेकर नावाच्या ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झालाय. तर दुसरीकडे बांद्र्यात स्कायवॉकचं मेटल शीट पडून 2 मुली जखमी झाल्या आहे. एस.व्ही.रोड भागात ही दुर्घटना घडली.