#एसआरए

Showing of 14 - 27 from 80 results
VIRAL VIDEO : मुंबईत तरुणाची स्टंटबाजी, टाॅम क्रुझसारखी मारली इमारतीवरून उडी

व्हिडिओNov 27, 2018

VIRAL VIDEO : मुंबईत तरुणाची स्टंटबाजी, टाॅम क्रुझसारखी मारली इमारतीवरून उडी

27 नोव्हेंबर : मुंबईत लोकलच्या दारात लोंबकाळत स्टंटबाजी करणारे महाभाग तुम्ही आजपर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून पाहिले असतील. पण एखाद्या सिनेमात उंच इमारतीवरुन दुसऱ्या इमारतीवर उडी मारणाऱ्या हिरोचा स्टंट एका तरुणाने प्रत्यक्षात केला आहे. मुंबईतील प्रभादेवी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर एसआरए इमारतीच्या छतावर हा खतरनाक स्टंट करण्यात आला. एसआरए इमारती या एकमेकांना पासून काही अंतरावर असतात. या व्हिडिओत स्पष्ट दिसतंय की, इमारतीच्या छतावर अगदी टोकावरून हा तरुण पळत येतो आणि दुसऱ्या इमारतीवर उडी मारतो. अगदी थोडक्यात तो दुसऱ्या इमारतीच्या कोपऱ्यावर पाय टेकवतो आणि पुढे उडी मारतो. हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. परंतु, हा व्हिडिओ पाहून कुणाला प्रोत्साहन देण्याचा आमचा मुळीच हेतू नाही. तुमचा जीव लाखमोलाचा असून असे स्टंट करू नये असं आमचं आवाहन आहे.