एशिया कप

Showing of 14 - 18 from 18 results
भारताचे श्रीलंकेसमोर 305 धावांचे आव्हान

बातम्याMar 13, 2012

भारताचे श्रीलंकेसमोर 305 धावांचे आव्हान

13 मार्चआशियाई चषक स्पर्धा मिरपूर वन डेत भारतीय टीमने गौतम गंभीर आणि विराट कोहलीच्या सेंच्युरीच्या जोरावर 304 रन्सचा पाया रचला. ऑस्ट्रेलिया दौर्‍यातल्या खराब कामगिरीनंतर एशिया कप स्पर्धेत खेळणार्‍या भारतीय टीमला चांगल्या सुरुवातीची गरज होती. आणि गंभीर-कोहलीने ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. सचिन तेंडुलकर झटपट आऊट झाल्यानंतर गौतम गंभीरच्या साथीला विराट कोहली मैदानात आला आणि या दोघांनी दुसर्‍या विकेटसाठी तब्बल 202 रन्सची पार्टनरशिप करत भारताला मोठा स्कोर उभा करुन दिला. या दोघांनीही शानदार सेंच्युरी ठोकली. गौतम गंभीरसाठी तर ही सेंच्युरी अधिक महत्वाची ठरली. ऑस्ट्रेलिया दौर्‍यातल्या खराब कामगिरीनंतर सीनिअर खेळाडूंवर जोरदार टीका होत असतानाच गंभीरची आजची खेळी दिलासा देणारी ठरली. दुसरीकडे जबरदस्त फॉर्मात असलेल्या विराट कोहलीने लंकेच्या बॉलर्सना पुन्हा एकदा आपल्या बॅटचा तडाखा दिला. विराट कोहलीची ही सलग दुसरी वन डे सेंच्युरी ठरली. विराट कोहलीने 120 बॉलमध्ये 7 फोर मारत 108 रन्स केले. तर गौतम गंभीरने 118 बॉलमध्ये 7 फोर मारत 100 रन्स केले.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading