#एम्स

Showing of 118 - 127 from 127 results
बॉम्बस्फोटाची माहिती देणार्‍याला 5 लाखांचं बक्षीस

बातम्याSep 8, 2011

बॉम्बस्फोटाची माहिती देणार्‍याला 5 लाखांचं बक्षीस

08 सप्टेंबरदिल्लीत हायकोर्टाबाहेर झालेल्या बॉम्बस्फोटाला आता जवळपास 30 तास उलटले असले तरी तपासयंत्रणांना कोणतंही मोठं यश मिळालेलं नाही. पण या स्फोटात खिळ्यांचा वापर झाल्याची माहिती फॉरेन्सिक अहवाला देण्यात आली आहे. अशी माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सूत्रांनी दिली. तर बॉम्बस्फोट करणार्‍यांबाबत माहिती देणार्‍याला पाच लाखांचं बक्षीस देण्यात येईल अशी घोषणाही एनआयए (NIA)नं केली. दरम्यान, बॉम्बस्फोटातील मृतव्यक्तींचा संख्या 12 वर पोहचली आहे. तर 91 जण जखमी आहे. जखमींवर राममनोहर लोहिया, एम्स आणि सफदरजंग हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेणारा हुजीनं पाठवलेला ई मेल जम्मूतून पाठवण्यात आल्याचे धागेदोरे पोलिसांना मिळाले आहेत. किश्तवार भागातल्या ग्लोबल इंटरनेट सायबर कॅफेमधून हा मेल आला. . याच कॅफेमधून हुजीचा ई मेल आला होता. या सायबर कॅफेच्या मालकासह पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, अतिरेक्यांनी बॉम्बस्फोटासाठी ज्या कारचा वापर केल्याचा संशय होता ती कार आता पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. पण या कारचा या स्फोटाशी संबंध नसल्याचं एनआयएनं स्पष्ट केलं.