एमआयएम

Showing of 287 - 291 from 291 results
बाळासाहेबांचं शेवटचं भाषण

बातम्याNov 17, 2012

बाळासाहेबांचं शेवटचं भाषण

24 ऑक्टोबरमी थकलोय, शारीरिक दृष्या कोसळलोय मला बोलताना ही धाप लागतेय, मला चालता येत नाही दिवसभर पडून असतो कसा हा आजार ? मला तुम्हाला भेटण्याची तीव्र इच्छा होती पण जाऊ द्या. मी 45 वर्ष शिवसेना सांभाळली तुम्हाला सांभाळलं. आता उद्धव,आदित्यला सांभाळा..इमानाला महत्व द्या. मी घराणेशाही लादली नाही ती तुम्ही स्वीकारली आता तुम्हीच सांभाळून घ्या अशी कळवळीची विनंती शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी समस्त शिवसैनिकांसह महाराष्ट्राला केली. शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच बाळासाहेबांविना दसरा मेळावा पार पडला. पण या मेळाव्यात बाळासाहेबांचा संदेश एका व्हिडिओ फूटेजव्दारे ऐकवण्यात आलं. अत्यंत भावूक असं बाळासाहेबांचं रूप पाहून शिवसैनिक भावूक झाले, अनेकांना अश्रू अनावर झाले. बाळासाहेबांनी आपल्या शैलीत चौफेर तोफ डागली. पण यावेळी बाळासाहेबांना संदेश देताना अश्रू अनावर झाले. 'आवाज कोणाचा...' या जयघोषाने मैदान दणाणून जाणार आणि शिवसेनाप्रमुखांच्या भाषणाला सुरुवात होणार हे चित्र गेली कित्येक वर्ष दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शिवसेनेचं पाहायला मिळायचं. पण या वर्षी असं काही घडलं नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रकृती ठीक नसल्यामुळे ते येऊ शकले नाही. बाळासाहेबांच्या भाषणाचा व्हिडिओ संदेश दाखवण्यात आला. तो संदेश ऐकून तमाम शिवसैनिक नव्हेच संपूर्ण महाराष्ट्राचं मन हेलावून गेलं. 86 वर्षाचे बाळासाहेब ठाकरे यांनी दिल्लीच्या राजकारणापासून ते नांदेड महापालिकेचा निकाल, 'दादर'मध्ये सेनेचा पराभव या सगळ्याविषयांवर भाष्य केलं. माझी तीव्र इच्छा होती आपल्या सगळ्यांना भेटायची पण काय करू माझी दुखणी सूरूच आहे. नऊ दिवसांचा आजार हा असा कसा ? डॉक्टारांनी मला क्षमा करावी. डॉक्टर जणू रुग्णांची प्रयोगशाळा करुन टाकतात. रिऍक्शन झालं की घ्या गोळ्या, परत गोळ्यांमुळे रिऍक्शन झालं की, पुन्हा त्यावरही गोळ्या..याला काही अर्थ नाही. उद्धव काम करत राहिला दुखणं अंगावर घेतलं. नशीब..कुठे परदेश दौर्‍यावर नव्हता वेळेवर आला बरं झालं. त्याची अँजिओप्लासिटी झाली तो घरी आला आणि आमची रवानगी हॉस्पिटलमध्ये झाली. सगळे रिपोर्ट आले. पण माझं ह्रदय ठीक होतं आणि असणारही कारण ते तुमच्याकडे आहे ते मी कोणालाही देणार नाही. आता शारीरिक दृष्ट्या कोसळलोय. मला बोलताना धाप लागतेय..मला चालता येत नाही. दिवसभर बेडवर पडलेला असतो. 45 वर्ष मी शिवसेना सांभळाली. अनेक दौरे केले,मैदानं गाजवली आणि आज असं काही होतंय. पंचकडी उखडून फेकून द्या, शरद पवार,सुशीलकुमार बेताल माणसं काय देशाचा कारभार चालला आहे. सगळा भिकारचोट पद्धतीने सुरू आहे. मी कधी सुशीलकुमारांवर बोललो नाही पण आज हेच सुशीलकुमार म्हणतात घोटाळे विसरून जाणार अरे काय बोलतोय काय तू ? उद्या वडरांच्या बाबतही बोलशील का ? मुळात ते (गांधी) घराणंचं लोकं विसरले पाहिजे. ते नष्ट होऊ दे अशी मी प्रार्थना करतो. ही पंचकडी म्हणजे सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी, अहमद पटेल, रॉबेट वडरा ही देशावर लादले गेलेली आहे. यांनी देशाची वाट लावली आहे. तुम्ही मुर्दाड हिंदू ही भंयकर गोष्ट कशी चालून घेतात ? भंयकर चाललंय सगळं...ही पंचकडी उखडून फेकून द्या नुसते बोंबलत बसू नका. आता कसं बोंबलायचं हेही मी सांगू का ? उलटा हात घ्याचा की सोईचा हात घ्यायचा हे ही सांगायचंय का ? असा संतप्त सवाल बाळासाहेबांनी शिवसैनिकांना केला. नांदेड पालिकेत एमआयएम पक्षाचे 11 नगरसेवक निवडून कसे आले ?तसेच त्या नांदेड पालिकेत आंध्राची एमआयएम पक्षाचे 11 नगरसेवक कसे निवडून आले ? भंयकर चाललंय सगळं...बरं यात त्या अशोकरावांचा उदोउदो झाला. आणि त्या मुंबई हिंसाचारात मुंब्रातील मुस्लामानांचा काय संबंध ? सगळी वाट लावून टाकली आहे. इंदिरा गांधींनी जो निर्णय घेतला होता त्याची पुनरावृत्ती व्हावी. आसाममध्ये सैन्य घुसवा आणि साफ करा...संख्या कमी करा. शिवसेना सत्तेवर होती तेंव्हा एकही दंगल झाली नाही. आजही दणका देण्याची तयारी फक्त शिवसेनेत आहे. मला सिमाप्रश्नाचं काय सांगता. वडरा तुझ्या घरातला एक तरी गेला का रे सिमाप्रश्नावर बोलायला ? 'मराठी माणसानं तरी सेनेच्या विरोधात उभं राहू नये' आज मी 86 वर्षांचा आहे गेली 45 वर्ष शिवसेना सांभाळली उभारली. हे दादर सांभाळलं. पण आज ह्याच दादरचे दोन तुकडे झाले. ज्या दादरमध्ये मी शिवसेनेचं भवन उभं केलं. त्या दादरमध्ये शिवसेनेचे दोन तुकडे पाडले गेले. ते करायला नको होतं. एकत्र या आणि काँग्रेसच्या धूळ चारा असं आवाहन बाळासाहेबांनी राज यांचं नाव न घेता केलं.शरद पवारांना शर्म वाटतं नाही का ? मुंबई म्हणे, बहुभाषिकांची असं शरद पवार म्हणतात त्याना हे म्हणायला शर्म नाही वाटली का ? मुंबई ही माझ्या मराठी बांधवांची आहे त्यांनी ही मुंबई मोठी केली. तुम्ही अजीज गुलाबचंदला ओळखतात का ? मुख्यमंत्र्यांच्या मांडी खाली ठेवलंय. गुपचूप जाऊन भेटी घेतात. कसं काही वाटतं नाही तुम्हाला. त्या मंत्रालयाला आग लागली. फाईली जाळल्यात त्यांना बरं झालं. आणि म्हणे श्वेतपत्रिका काढणार शी...'अवर नेशन इज द नेशन ऑफ क्लीन चीट आणि चीटर्स' कोणत्याही घोटाळ्यात कोर्टाने याला दिलासा दिला त्याला दिलासा अरे पण कशासाठी दिला. त्याला आठ दिवस जुळावजूळव करण्यासाठी दिली ? आणि तेही तो करणारच आणि नंतर का आले पुन्हा ते क्लीन चीट..भंयकर चालले आहे सगळं...हे क्लीन चीट नाही हे तर अवर नेशन इज द नेशन ऑफ क्लीन चीट आणि चीटर्स असं झालंय. 'उद्धव,आदित्यला सांभाळून घ्या'कृपा करा आणि उठा आवाज करा तिकडे छोटी छोटी देश आंदोलनं करत आहे. तुमच्या अंगात रक्त आहे का नाही ? तुमच्या रक्तात धमक असेल तर उठा माझ्यावर कृपा करा. शिवसेना काय करतेय म्हणे आजवर खूप काही केलं. पण बाबांनो, आता मी थकलोय. मी मैदान गाजवणार माणूस. आता बिछण्यावर पडून आहे. उद्धव म्हणतो व्यंगचित्राचे पुस्तक काढणार..शिवतीर्थावर आजही येण्यासाठी अतूर आहे. पण आज अंगात ताकद नाही. 45 वर्ष मी शिवसेना सांभाळली आता झेपत नाही..मी तुम्हाला सांभाळलं...इमान सांभाळून ठेवा. शिवसेना कोणी हरू शकणार नाही. शरद पवारांचं ठीक आहे..पण मी घराणेशाही लादली असेल तर विसरून जा...मी लादली नाही आणि तुम्हीही ती स्विकारली..सांभाळून घ्या...उध्दव, आदित्यला सांभाळा आणि इमानाला महत्व द्या. तमाम महाराष्ट्राला माझीही नतमस्तक विनंती.

ताज्या बातम्या