एफडीआय

Showing of 27 - 35 from 35 results
'एफडीआयला पाठिंबा पण स्थानिकांनाच नोकर्‍या द्या'

बातम्याSep 18, 2012

'एफडीआयला पाठिंबा पण स्थानिकांनाच नोकर्‍या द्या'

18 सप्टेंबरपरदेशी गुंतवणुकीला (एफडीआय) मनसेचा पूर्ण पाठिंबा आहे पण पाठिंबा देत असताना आताच स्पष्टपणे सांगतो महाराष्ट्रात एफडीआय आल्यावर त्यामध्ये महाराष्ट्रातील मराठी तरुण-तरुणींनाच नोकरी द्यावी अशी अट घालत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपला पाठिंबा जाहीर केला. तसेच एनडीएच्या भारत बंदमध्ये मनसे सहभागी होणार नाही असंही राज यांनी स्पष्ट केलं.एकीकडे एफडीआयच्या विरोधात राजकीय पक्षांनी दंड थोपटले असताना राज यांना काँग्रेसच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. राज यांनी आपल्या निवासस्थानी कृष्णकुंजवर पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.कोणतीही दरवाढ कुणालाही न आवडणारी गोष्ट आहे. कधीच दरवाढीचं स्वागत होऊ शकत नाही. पण आज वस्तूस्थितीही लक्षात घेतली पाहिजे. एनडीएने पुन्हा एकदा भारत बंदची हाक दिली आहे. आमच्याकडेही याबद्दल विचारना केली. पण महाराष्ट्राचं लाडकं दैवत गणपती बाप्पांचं उद्या आगमन होतं आहे. अशा काळात बंद म्हणून का पुकारायचा ? दीड दिवसांचा गणपती आता मोठ्या प्रमाणावर बसवला जातोय. गुरुवारी दीड दिवसांच्या बाप्पांच्या विसर्जनाच्या दिवशी बंद करुन का म्हणून 'विघ्न' घालयाचं त्यामुळे या भारत बंदला मनसेचा पाठिंबा नाही अशी स्पष्ट भूमिका राज यांनी जाहीर केली. तसेच दिल्लीतल्या लोकांना सणवार समजत नाही का ? असा सवालही राज यांनी उपस्थित केला. तसेच डिझेल दरवाढीला राज यांनी विरोध केला. पण, ही दरवाढ गरजेची होती. राज्यांनी व्हॅट कमी केला असता तर दरवाढीची झळ बसली नसती, असंही राज यांनी म्हटलंय. एफडीआयचा प्रश्न हा भाजपच्या काळात आला होता. मग आता विरोध कशाला. मुळात आता वाद असा आहे की, तुम्ही लुटायच की आम्ही लुटायच..? मग आता जी लूट सुरु आहे त्याच काय ? एफडीआयच्या प्रश्नावर अनेक दिग्गजाशी चर्चा करुन आम्ही पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. देशात परदेशी गुंतवणूक आलीच पाहिजे पण याचा असा अर्थ नाही की, आपण कोणाच्या अधिपत्याखाली जाणार वगैरे असं काहीही नाही. विशेष म्हणजे एफडीआयला ज्या राज्यांनी आपला पाठिंबा दिला नाही त्यांनी वेगळाच सुर लावला आहे. यामध्ये बिहार,कर्नाटक,ओडिसा,झारखंड यांनी नकार दर्शवला आहे. एफडीआयच्या माध्यमातून 10 लाख लोकसंख्या असलेल्या शहरात यांची दुकानं येणार आहे. देशात अशी शहर फक्त 53 आहे आणि राज्यात 10 आहे त्यामुळे बाकीच्या महाराष्ट्राचा संबंध नाही. त्यामुळे या दुकानांना मनसेच्या वतीने रितसर पत्र दिले जाईल मी आताच सांगून ठेवतो जर मराठी मुला-मुलींना नोकरी दिली नाही तर राज्यात एकही दुकान उभे राहु देणार नाही असा इशारा राज ठाकरे यांनी दिला. तसेच काँग्रेसच्या अनेक निर्णयांना आपला विरोध असतो पण एखादी चांगली गोष्ट येत असेल तर तीला विरोध न करता मान्य केलं पाहिजे असंही राज यांनी स्पष्ट केलं.