#एफडीआय

Showing of 14 - 27 from 35 results
औषध विक्रेत्यांची 'भारत बंद'ची हाक

बातम्याMay 9, 2013

औषध विक्रेत्यांची 'भारत बंद'ची हाक

09 मेप्राध्यापकांचा संप, डॉक्टरांच्या संप, एलबीटीविरोधात व्यापार्‍यांचा बंद गेल्या दोन महिन्यापासून एकपाठोपाठ सुरू असलेल्या आंदोलनांमुळे सर्वसामान्य जनता वैतागून गेलीय. आता यात औषध विक्रेत्यांनीही भर टाकली आहे. केंद्र सरकारच्या नव्या फार्मास्युटीकल धोरणाविरोधात अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेनं उद्या भारत बंद पुकारला आहे. केंद्राच्या नव्या धोरणामुळे औषध व्यवसायिकांचा नफा कमी होईल अशी भीती औषधी विक्रेत्यांनी व्यक्त केलीय. तसंच दुकानांमध्ये फार्मासिस्ट असणं बंधनकारक करण्याच्या सरकारच्या निर्णयालादेखील विक्रेत्यांचा तीव्र विरोध आहे. औषध क्षेत्रामध्ये एफडीआय फक्त उत्पादनापुरतच मर्यादित ठेवावं अशीही औषध विक्रेत्यांची मागणी आहे. या बंदमध्ये संपूर्ण भारतातील सुमारे साडेसात लाख दुकानदार सहभागी होणार असल्याचं संघचटनेच्या वतीनं कळवण्यात आलं आहे. या बंद दरम्यान, औषध विक्रेते प्रत्येत जिल्ह्यात जिल्हाधिकारी आणि अन्न आणि औषध प्रशासनांच्या कार्यालयांवर मुक मोर्चा काढून निवेदन देणार आहेत.