News18 Lokmat

#एनडीए

Showing of 222 - 235 from 274 results
तरुण गोगाईंनी फेटाळली राजीनाम्याची मागणी

बातम्याJul 27, 2012

तरुण गोगाईंनी फेटाळली राजीनाम्याची मागणी

27 जुलैआसाममध्ये गेल्या सहा दिवसांपासून हिंसाचार सुरूच आहे. मृतांचा आकडा 44 वर गेलया. पण, सरकारनं हिंसाचार आटोक्यात आणण्यासाठी ठोस पावलं उचलली नसल्याचा आरोप मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनी फेटाळून लावला आहे. केंद्रीय सुरक्षा दलांची संख्या कमी केल्यानंच दंगल आटोक्यात आणणं कठीण झालं, असं गोगोई यांनी म्हटलंय. आणि राजीनाम्याची मागणी फेटाळून लावली आहे. आणि त्यांनी हिंसाचारासाठी एनडीए सरकारला जबाबदार धरलंय. एनडीए सरकारच्या धोरणांमुळेच आसाममध्ये ही परिस्थिती निर्माण झाल्याचं त्यांनी म्हटलंय. पण, गोगोईंना धक्का देत काँग्रेसने आसामसाठी 10 जणांची समन्वय समिती स्थापन केलीय. काँग्रेसचे खासदार रहमान खान यांनी गोगोईंवर जाहीर टीका केलीय. आणि त्यांना बदलण्याची मागणी केली आहे.