ऊर्जामंत्री

Showing of 53 - 66 from 90 results
विलासरावांनी फोडलं सचिवांवर खापर

बातम्याJun 26, 2012

विलासरावांनी फोडलं सचिवांवर खापर

26 जूनआदर्श सोसायटी घोटाळ्याप्रकरणी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची आज न्यायालयीन आयोगाने साक्ष नोंदवली आहे. यामध्ये विलासरावांनी सचिवांवर जबाबदारी ढकलली आहे. आपल्यावर झालेले आरोप फेटाळत सचिव दर्जाच्या अधिकार्‍यांनीच फाईल्स चेक करून माझ्याकडे पाठवल्या होत्या. मला प्रत्येक पान बघणं शक्य नव्हतं. म्हणून त्यांनी चेक फाईल्सवर मी सह्या केल्या तसेच बेस्टचा एफअसआय आदर्श दिलेल्या निर्णयाबद्दल मला माहिती नसल्याचंही विलासरावांना सांगितलं. काल सोमवारी माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांची साक्ष नोंदवण्यात आली. यावेळी शिंदेंनी विलासराव देशमुख यांच्याकडे बोट दाखवलं. आपण फक्त अधिकार्‍यांकडून आलेल्या नोटींग्ज मंजूर केल्या. आदर्शला जमीन देण्याबाबतचा निर्णय मी सूत्रं घेण्यापूर्वीचं झालेला होता असं सुशीलकुमार शिंदे यांनी आयोगाला सांगितलं. प्रत्येक फाईल तपासणं मुख्यमंत्र्यांसाठी शक्य नसतं असंही शिंदे म्हणालं. एकंदरीतच सुशीलकुमारांनी जे सांगितलं त्याचाच धागा पकडत विलासरावांनीही तोच कित्ता गिरवला आहे.विलासराव देशमुखांची साक्ष उद्याही सुरू राहणार आहे.तो मी नव्हेच ! - विलासरावांची साक्ष'इतर मंत्रालयातल्या सचिवांनी जर एखाद्या फाईलला मंजुरी दिली असेल, तर मुख्यमंत्र्यांचे सचिव त्यातले बारकावे तपासत नाहीत. मी मुख्यमंत्री असताना माझे मुख्य सचिव मला तोंडी माहिती देत असतं. आदर्शच्या फाईल्स माझ्याकडे कुणी आणल्या, हे ही मला आठवत नाही. मी आदर्शशी संबंधित पत्राचा केवळ विषय वाचला आणि शेरा मारून पुढे पाठवलं होता. मात्र,माझ्या शेर्‍यात मी 'तात्काळ' हा शब्द वापरला, कारण तो मी नेहमी वापरतो. आदर्शचे मुख्य प्रवर्तक कन्हैयालाल गिडवाणी यांच्या पत्रावर मी न वाचता शेरा दिला. मी परिस्थिती तपासली नाही कारण जमिनीशी संबंधित बाबी तपासणं कलेक्टरचं काम आहे. 'त्वरित करा' असं मी गिडवाणींच्या फाईलवर लिहिलं, कारण त्यांनी मला ही फाईल अनेक दिवसांपासून प्रलंबित असल्याचं सांगितलं होतं. गिडवाणी आमदार असल्यामुळे माझ्यापर्यंत सहज पोहोचू शकत होते. आदर्शच्या जमिनीचा वाद आहे, हे कुणीही माझ्या निदर्शनास आणून दिलं नाही. त्या जागी बाग होती, हेही कुणीच मला सांगितलं नाही. ए. पी. सिन्हा या नगरविकास सचिवांनी काही बाबी माझ्या लक्षात आणून दिल्या नाहीत. नगरविकास मंत्रालयातल्या अधिकार्‍यांनी माझ्याशी याबाबत चर्चा केली नाही. गिडवणींच्या पत्रावर मी सही केली तेव्हा ती कोणत्या प्रस्तावाबद्दल होती, याची नीट माहिती नगरविकास मंत्रालयानं दिली नाही. तेव्हा सुनील तटकरे नगरविकास राज्यमंत्री होते. तटकरेंनी गिडवाणींशी व्यवहार करताना माझ्याशी सल्लामसलत केली नाही आणि प्रकाश पेठे मार्गाची रुंदी कमी करायला एमएसआरडीसीने आक्षेप घेतला, हे माझ्या लक्षात आणून दिलं गेलं नाही.'

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading