News18 Lokmat

#उस्मानाबाद

Showing of 586 - 599 from 670 results
उस्मानाबादेत तुळजाभवानीच्या दर्शनासाठी लाखो भाविक दाखल

बातम्याOct 29, 2012

उस्मानाबादेत तुळजाभवानीच्या दर्शनासाठी लाखो भाविक दाखल

29 ऑक्टोबरआज कोजागिरी पोर्णिमेच्या निमित्ताने उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजाभवानीच्या दर्शनासाठी पाच लाख भाविक दाखल झाले आहे. सोलापूर, बार्शी, लातूर, उस्मानाबाद तसेच कर्नाटकातील भाविक देवीच्या दर्शनासाठी पायी येतात. येणार्‍या भाविकांच्या नाष्ट्याची व्यवस्था स्थानिक व्यापार्‍यांनी केली आहे. तर सेवाभावी संस्थांकडून मोफत अन्नदानाचे तंबू उभारले आहेत. सोलापुरातील रुपभवानी ते तुळजापूर भवानी मंदीर हे 65 किलोमीटरचे अंतर आहे, भाविक हे अंतर पायी चालत येतात. सोलापुरातील भाविकांचा पहिला मुक्काम ताडकलवाडी येथे असतो. या काळात प्रशासनाने या मार्गावरील सर्व वाहने बंद ठेवली आहेत. आज रात्रीच्या देवीच्या छबीन्यासाठी मानाच्या समजल्या जाणार्‍या सोलापूरच्या काठ्या तुळजापुरात दाखल झाल्या आहेत.