#उस्मानाबाद

Showing of 365 - 378 from 378 results
राज ठाकरेंची चारा छावणीला भेट

महाराष्ट्रMay 15, 2013

राज ठाकरेंची चारा छावणीला भेट

05 मेमनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मनसेतर्फे सुरू करण्यात आलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातल्या उमरगा तालुक्यातील अष्टामोडच्या चारा छावणीला भेट दिली. राज ठाकरे गेल्या महिन्यात जिल्ह्यातल्या दुष्काळीची पाहणी करण्यासाठी आले असता दुष्काळग्रस्तांना मनसेतर्फे योग्य ती मदत करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर त्यांनी यापूर्वी जिल्ह्यात पाणी पुरवठ्यासाठी 10 टँकर दिले आहेत. त्याच प्रमाणे अष्टामोडमध्ये 500 जनावरांची मोफत चारा छावणीही सुरू केलीय. याच छावणीची पाहणीकरण्यासाठी आणि दुष्काळग्रस्तांशी संवाद साधण्यासाठी ते उस्मानाबाद जिल्ह्यात आले होते.त्यांच्या सोबत आमदार बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आणि कार्यकर्तेही होते.

Live TV

News18 Lokmat
close