#उभं राहून

Showing of 1 - 14 from 57 results
हा Special Report पाहिल्यानंतर तुम्ही पाणीपुरी खाणं सोडून द्याल

व्हिडिओJan 6, 2019

हा Special Report पाहिल्यानंतर तुम्ही पाणीपुरी खाणं सोडून द्याल

रस्त्यारस्त्यावर मिळणारी चटपटीत, तोंडाला पाणी सुटेल अशी पाणीपुरी खायला कोणाला नाही आवडत? तुम्हीही रस्त्यावर उभं राहून अगदी ताव मारून पाणीपुरी खात असाल. पण जरा सांभळून. कारण हा Special Report पाहिल्यावर रस्त्यावर पाणीपुरी खायची की नाही याचा नक्कीच तुम्ही विचार कराल. पिंपरीत अत्यंत गलिच्छ वातावरणात पाणीपुरीचं पीठ पायानं मळतानाचा धक्कादायक VIDEO VIRAL झाला आहे. पिंपरी-चिंचवडच्या दापोडी परिसरातील हा प्रकार समोर आल्यानंतर अन्न व औषध प्रशासन खडबडून जागं झालं आहे. FDA चे संबधित अधिकाऱ्यांनी या परिसरात तपासणी मोहिम हाती घेतली आहे. पण पाणीपुरीचं पीठ अशा पद्धतीनं मळतानाचा हा पहिलाच व्हिडिओ नाहीये. यापूर्वी पुण्यातही असाच प्रकार समोर आला होता. रस्त्यावर मिळणाऱ्या पंधरा वीस रुपयांची पाणीपुरी ही अशा गलिच्छ वातावरणात तयार केली जाते आणि ती तयार करणाऱ्यांना त्याचं कोणतंच सोयरसुतक नसतं. कारण स्वच्छता, आरोग्य अशा गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचलेल्याच नसतात. पाहुया यासंदर्भातला विशेष रिपोर्ट...

Live TV

News18 Lokmat
close