#उपनिरीक्षक

धावती बस पकडताना तरुण चाकाखाली सापडला,थरकाप उडवणारा VIDEO

महाराष्ट्रDec 2, 2018

धावती बस पकडताना तरुण चाकाखाली सापडला,थरकाप उडवणारा VIDEO

पंकज क्षीरसागर, परभणी,23 नोव्हेंबर : शहरातील बसस्थानक परिसरात मंगळवारी रात्री बसमध्ये चढताना युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही सर्व घटना बस स्थानकातील सीसीटीव्हीत कैद झाली आहे.परभणीच्या दैठणा येथील हनुमान माणिकराव कच्छवे हे मंगळवारी रात्री शहरातील बसस्थानक परिसरात होते. दैठणा येथे जाण्यासाठी ते बसची वाट पाहत होते. यावेळी गंगाखेडकडे जाणारी बस बसस्थानकातून बाहेर निघत असताना त्यांनी बसकडे धाव घेतली. बसचा दरवाजा बंद असताना चालत्या बसचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न हनुमान कच्छवे करीत होते. यावेळी दरवाजा तर उघडला नाही; परंतु हनुमान कच्छवे बसखाली आले. यातच त्यांचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी बसस्थानक चौकीतील व्ही.बी. पिंपळे यांच्या माहितीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा तपास कोतवाली पोलीस ठाण्याचे सहाय्यक उपनिरीक्षक पवार करीत आहेत.

Live TV

News18 Lokmat
close