#उन्हाळा

Showing of 1 - 14 from 47 results
Special Report : दुष्काळाचा ग्राऊंड रिपोर्ट थेट 'दुष्काळवाड्या'तून

व्हिडिओJan 9, 2019

Special Report : दुष्काळाचा ग्राऊंड रिपोर्ट थेट 'दुष्काळवाड्या'तून

औरंगाबाद, 9 जानेवारी : यंदा मराठवाड्यात दुष्काळाची दाहकता सर्वाधिक असून, उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच ग्रामीण भागाला त्याचे चटके जाणवू लागले आहेत. प्यायला पाणी नाही, जनावरांना चारा नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली असताना, जगायचं कसं असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. खरीप गेलं, रब्बीही गेल्यात जमा झाला आहे. हातात पैसा नाही, पोट भरता येईल असा रोजगारसुद्धा नाही. एकंदर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या मुला-मुलिंची लग्नही खोळंबली आहेत. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची मुलं रोजगार शोधण्यासाठी म्हणून शहराकडे धाव घेताहेत. तर पोट भरण्यासाठी म्हणून बहुतांश शेतकऱ्यांनी स्थलांतर केलं आहे. मराठवाड्यात काय आहेत अन्नदात्याच्या अडचणी? चारा छावण्यांची किती आहे आवश्यकता? पाण्याचं नियोजन काय? या सर्व गोष्टींचा आढावा घेतला आहे औरंगाबादचे न्यूज18 लोकमतचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी...

Live TV

News18 Lokmat
close