Elec-widget

#उद्योग

Showing of 703 - 716 from 734 results
नेरूळ-उरण रेल्वे प्रकल्प रद्द

बातम्याDec 14, 2008

नेरूळ-उरण रेल्वे प्रकल्प रद्द

14 डिसेंबर, मुंबईविनय म्हात्रेसिडकोने मुंबईचा भार कमी करण्यासाठी नवी मुंबई शहर वसवलं. शहर वसवताना रेल्वेसेवा पुरवण्याचं आश्वासन नागरिकांना देण्यात आलं होतं. त्यानुसार नेरूळ-उरण रेल्वेसेवेचं कामही सुरु करण्यात आलं. ते पूर्णत्वास येण्यापूर्वी ही सेवाच बंद करण्याचा निर्णय सिडकोनं घेतला आहे.सुरुवातीस सीएसटी ते मानखुर्द ही हार्बर लाईनची सेवा पुढं पनवेल पर्यंत वाढविण्यात आली. दुसर्‍या टप्प्यात ठाणे वाशी ही सेवा सुरु करण्यात आली. याच महिन्यात ठाणे- नेरूळ सेवा ही सुरु होणार होती. उरण परिसराचा वाढता विकास पाहता ही सेवा लवकर सुरू व्हावी यासाठी सिडकोवर दबाव वाढू लागला होता. असं असताना सिडकोनं अचानक रेल्वेला पत्र पाठवून नेरूळ-उरण मार्गावर कोणतंच काम केलं जाणार नसल्याचं कळवलं आहेनेरूळ उरण या रेल्वे मार्गाच्या भरावाचं काम पूर्ण झालंय. खारफुटीमुळं हा प्रोजेक्ट अडला होता. त्याचा मार्गही मोकळा झालाय, असं असताना सिडकोनं या मार्गावरील रेल्वेसेवा का बंद केली असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. या निर्णयामुळे आश्चर्याचा धक्का बसल्याचं ठाण्याचे खासदार प्रकाश परांजपे यांनी सांगितलं.67 टक्के सिडकोचे 33टक्के रेल्वेचे असा हा 500 करोड रुपयाचा प्रोजेक्ट होता. सिडकोने यावर 100 कोटी रुपये खर्चही केलेत. पूल उभारुन झालेत. पण हा प्रोजेक्ट आता गुंडाळण्यात आलय.याला कारण एकच आहे. 500 कोटीचा प्रोजक्ट 1300 कोटीवर गेलाय. हा खर्च आता सिडकोच्या आवाक्याबाहेर गेल्याचं बोललं जात आहे. शहर वसवण्यापूर्वी सिडकोनं लोकांना दिलेल्या अनेक आश्वासनांना केराची टोपली दाखविली. पण सिडकोच्या या निर्णयानंतर लोकांमध्ये मात्र संताप वाढलाय. "सिडकोकडे खासदार म्हणून जाब विचारणार. जो निर्णय घ्यायचाय तो सिडकोनं घ्यायचाय. लोकांनाही त्यांनीच उत्तर द्यायचा आहे" असं प्रकाश परांजपे यांनी स्पष्ट केलंएसईझेड, जेएनपीटी याबरोबर उरण परिसरात मोठंमोठे उद्योग याक्षेत्रात येत असताना सिडकोनं हा निर्णय का घेतला. याबाबत मात्र सिडको बोलण्यास तयार नाही. अशा परिस्थितीत नागरिकांच्या प्रश्नांना उत्तर कोण देणार ? या प्रश्नाचं उत्तर कोणाकडेच नाही.