उदयनराजे भोसले Videos in Marathi

Showing of 66 - 79 from 117 results
VIDEO : मुलं मुलींकडे बघणार नाहीतर काय मुलांकडे बघणार? उदयनराजेंचं विद्यार्थिनीच्या प्रश्नावर उत्तर

व्हिडीओMar 22, 2019

VIDEO : मुलं मुलींकडे बघणार नाहीतर काय मुलांकडे बघणार? उदयनराजेंचं विद्यार्थिनीच्या प्रश्नावर उत्तर

किरण मोहिते, सातारा, 22 मार्च : आपल्या बिनधास्त शैलीमुळे कायम चर्चेत असणारे साताऱ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार तथा उमेदवार उदयनराजे भोसले पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. आज उदयनराजे भोसले यांनी कोरेगाव इथल्या डी पी भोसले कॉलेजच्या विद्यार्थ्यांशी उदयनराजे भोसले यांचा संवाद ठेवण्यात आला होता. यामध्ये एका विद्यार्थिनीने काही टवाळ मुलांकडून छेडछाड होत असल्याची तक्रार केली. 'काही मुले विद्यार्थिनींना त्रास देतात, मुलींसमोर गाडी आडव्या लावतात', असा प्रश्न विचारला त्यावर उदयनराजे भोसले यांनी दिलेल्या उत्तराने उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. यावर उदयनराजे म्हणाले,'जो प्रश्न विचारलाय यावर मी काय उत्तर देऊ मलाच कळत नाही. मात्र ही गोष्ट नैसर्गिक आहे. तुम्हाला थोडा त्रास होईल पण मुलं मुलींकडे बघणार नाहीत तर काय मुलांकडे बघणार?' असं उत्तर राजेंनी दिलं. नंतर सारवासारव करत उदयनराजे भोसले यांनी ही जर विकृती असेल तर त्याला समजून सांगू म्हणत प्रश्नावर अधिक बोलणं टाळलं.

ताज्या बातम्या