News18 Lokmat

#उत्तरप्रदेश

Showing of 209 - 222 from 253 results
पाच राज्यात निवडणुकीचे वाजले बिगुल

बातम्याDec 24, 2011

पाच राज्यात निवडणुकीचे वाजले बिगुल

24 डिसेंबर2011 वर्ष संपत आलंय आणि आता देशात वारे वाहू लागलेत ते पुढल्या वर्षी पाच राज्यात होणार्‍या विधानसभा निवडणुकीचे... 2012च्या सुरुवातीलाच उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, मणिपूर आणि गोवा या पाच राज्यात विधानसभा निवडणुका होत आहे. या निवडणुकीचा कार्यक्रम आज निवडणूक आयोगाने जाहीर केला. सर्वांचे लक्ष लागून असलेल्या आणि देशातल्या सर्वात मोठ्या असलेल्या राज्यात म्हणजे उत्तर प्रदेशात एकूण सात टप्प्यात निवडणूक होत आहे. मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरैशी यांनी आज ही घोषणा केली. त्यानंतर ताबडतोब पाचही राज्यांमध्ये आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. आता उत्तरप्रदेश, गोवा, पंजाब, उत्तराखंड आणि मणिपूरमध्ये रणधुमाळी सुरु होणार आहे. गोवा येथे 3 मार्च , पंजाब 30 जानेवारी रोजी निवडणुका होणार आहे. तर उत्तरप्रदेशमध्ये सात टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात चार फेब्रुवारी, दुसर्‍या टप्प्यात आठ फेब्रुवारी, तिसरे 11 , चौथे 15, पाचवे 19 , सहावे 26 आणि सातव्या आणि अंतिम टप्प्यात 11 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. उत्तराखंडमध्ये 30 जानेवारी तर मणिपूरमध्ये 28 जानेवारीला मतदान होणार आहे. विशेष म्हणजे उत्तरप्रदेशमध्ये विधानसभेसाठी 403, पंजाब 117, गोवा 30 आणि मणिपूरमध्ये 60 जागा आहेत. यासर्व निवडणुकांची मतगणना 4 मार्च रोजी होणार आहेत.तसेच येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवारांच्या निवडणूक खर्चावर बारिक लक्ष ठेवण्यात येईल, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त कुरैशी यांनी सांगितले. तसेच तक्रार नोंदवण्यासाठी 1950 हा टोलफ्री क्रमांक निवडणूक आयोगाने जारी केला आहे. कसा आहे हा निवडणूक कार्यक्रम ?उत्तर प्रदेश - 7 टप्प्यात मतदान- मतदान : 4,8,11,15,19,23 आणि 28 फेब्रुवारी- मतमोजणी : 4 मार्च- एकूण जागा : 403उत्तराखंड - मतदान : 30 जानेवारी- मतमोजणी : 4 मार्च- एकूण जागा : 70गोवा - मतदान : 3 मार्च- मतमोजणी : 4 मार्च- एकूण जागा : 40पंजाब - मतदान : 30 जानेवारी- मतमोजणी : 4 मार्च- एकूण जागा : 117मणिपूर - मतदान : 28 जानेवारी- मतमोजणी : 4 मार्च- एकूण जागा : 60पक्षीय बलाबल उत्तर प्रदेश : 403 जागाबहुजन समाज पक्ष : 219समाजवादी पक्ष : 88काँग्रेस : 20भाजप : 48राष्ट्रीय लोक दल : 10इतर : 10रिक्त जागा : 8उत्तराखंड : 70 जागाभाजप : 34काँग्रेस : 21अपक्ष आणि इतर : 15गोवा : 40 जागाकाँग्रेस-राष्ट्रवादी : 23भाजप : 12इतर : 3रिक्त जागा : 2पंजाब : 117 जागाशिरोमणी अकाली दल : 45भाजप : 19काँग्रेस : 43अपक्ष : 5रिक्त जागा : 5मणिपूर : 60 जागाकाँग्रेस : 30अपक्ष : 10मणिपूर पिपल्स पार्टी : 5इतर : 15