#उत्तरप्रदेश

Showing of 1 - 14 from 149 results
VIDEO : सुसाट रेल्वेखाली थरारक स्टंट !

देशSep 12, 2018

VIDEO : सुसाट रेल्वेखाली थरारक स्टंट !

एखाद्या सिनेमात शोभावा असा हा थरारक स्टंट कॅमेऱ्यात कैद झालाय. उत्तरप्रदेशमधला हा व्हिडिओ व्हायरल झालाय. यात धावत्या रेल्वेखाली हा तरूण लोंबकाळत होता. जराशी चूक झाली असती तर यात त्याचा जीव गेला असता. हा स्टंट करणारा चोर होता पोलिसांनी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्याला अटक केली. या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय की, हा तरुण भरधाव रेल्वेखाली लटकलेला आहे. काही वेळानंतर रेल्वेखालील लोखंडी राॅडला पकडून तो हळूहळू पुढे येतो आणि रेल्वेच्या दाराला पकडून रेल्वेच्या डब्यात सुखरूप पोहोचतो. अंगाच थरकाप उडवणार हा व्हिडिओ काही मिनिटांचा आहे. पण यात थोडीशी जरी चूक झाली असती तर यात तरुणाचा हकनाक जीव गेला असता. हा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी हरदोई आणि लखनऊच्या दरम्यान रेकाॅर्ड करण्यात आलाय. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तरुणाचा शोध घेतला. अमित कश्यप असं या तरुणाचं नाव आहे. अमित हा कोतवाली हरदोई येथील मंगलीपुरवा गावात राहतो. अमित हा रेल्वेत चोरी करायचा. पोलिसांनी या तरुणाला अटक केलीये.

Live TV

News18 Lokmat
close