#उडी

Showing of 859 - 872 from 935 results
भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदावर रावसाहेब दानवेंचा दावा

बातम्याFeb 7, 2013

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदावर रावसाहेब दानवेंचा दावा

07 फेब्रुवारीभाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची चर्चा सुरू असताना आता जालन्याचे खासदार रावसाहेब दानवे यांनीही यात उडी घेतली आहे. प्रदेशाध्यक्षपद मलाच मिळावं अशी मागणी भाजपचे खासदार रावसाहेब दानवे यांनी केली आहे. याबाबत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलणं झालं असून प्रदेशाध्यक्षपद मलाच मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. गेल्यावेळी सुधीर मुनगंटीवार अध्यक्ष होणार म्हणून काही वरिष्ठ नेत्यांनी आग्रह केल्यानं मी माघार घेतली होती असा दावा रावसाहेब दानवे यांनी केला आहे.