#इशारा

Showing of 2939 - 2952 from 3195 results
रेमंड सुरू होण्याची शक्यता मावळली

बातम्याMay 19, 2010

रेमंड सुरू होण्याची शक्यता मावळली

19 मे एकेकाळी ठाण्याची शान समजली जाणारी रेमंड कंपनी पुन्हा सुरू होण्याची शक्यता मावळली आहे. सहा महिन्यांपासून बंद पडलेला हा प्लांट पुन्हा सुरू करणे शक्य नसल्याचे कंपनीचे मालक गौतम सिंघानिया यांनी जाहीर केले आहे. सहा महिन्यांपासून कामगारांना कंपनीतर्फे पगार दिला जात आहे. पण आज शिवसेनेने कंपनीबाबत तातडीने निर्णय घेण्याच्या मागणीसाठी आंदोलन केले. यावेळी कंपनीच्या सिक्युरिटी गार्डला धक्काबुक्की करण्यात आली. 126 जागेवर एकर जागेवर हा प्लांट पसरला आहे. पण सिंघानिया यांच्या या घोषणेमुळे सुमारे पाच हजार कामागारांच्याभवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कंपनी बंद करू नये, नाही तर शिवसेना स्टाइलने आंदोलन करण्याचा इशारा आमदार प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. दरम्यान रेमंडने कंपनीच्या परिसरात राहणार्‍या 100 कामगारांना घर सोडणाच्या नोटीसा दोन दिवसांपूर्वीच बजावल्या आहेत.