इमारत

Showing of 625 - 638 from 671 results
सांस्कृतिक भवन खासगी संस्थेच्या दावणीला

बातम्याOct 6, 2010

सांस्कृतिक भवन खासगी संस्थेच्या दावणीला

प्रवीण मनोहर, अमरावती 6 ऑक्टोबरअमरावती जिल्ह्यातील लोणटेक येथे खासदार निधीतून जनतेच्या सोयीसाठी बांधण्यात आलेले सांस्कृतिक भवन सध्या हैदराबाद येथील वरलक्ष्मी कंपनीला भाड्याने दिल्याने गावकरी नाराज आहेत. संत तुकडोजी महाराज सांस्कृतिक विकास संस्थेला खासदार निधीतून 25 लाख रूपये खर्च करून बांधण्यात आलेले सभागृह लोकांच्या उपयोगात येत नाही. संस्था मात्र आपली तुंबडी भरत आहे.मातोश्री कौसल्याबाई परिहार सभागृह 2005-06 या आर्थिक वर्षातील खासदार निधीतून बांधण्यात आले. मात्र या सभागृहात कोणतेही समारंभ होत नाहीत. कारण हे सभागृह वरलक्ष्मी कंपनीला भाड्याने देण्यात आले आहे. कंपनीने सभागृहात आपले ऑफीस थाटले आहेयं. या जागेवर पहिल्यांदा शाळा आणि नंतर दवाखाना बांधण्याचे आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र शाळा किंवा दवाखाना झालाचं नाही. आता हे सभागृह देखील उपयोगाचं नसल्याने गावकरी नाराज आहेत.हे सभागृह संत तुकडोजी महाराज सांस्कृतिक विकास संस्थेच्या ताब्यात आहे. याच संस्थेने ते भाड्याने दिले. खासदार निधीतून बांधण्यात आलेल्या इमारतीचा उपयोग लोकांना होतो की नाही याकडे लक्ष द्यायला जिल्हा प्रशासनालाही वेळ नाही.लाखो रूपयांचा खर्च करून बांधण्यात आलेली इमारत लोकांच्या कामाऐवजी खासगी उद्योगासाठी वापरली जाते. प्रशासनाला मात्र याचे काहीही सोयर सुतक नाही.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading