#इंजिनियर

हर हर महादेवचा घोष करत भक्तांच्या काट्यांमध्ये उड्या, अंगावर काटा आणणारा VIDEO

व्हिडिओNov 20, 2018

हर हर महादेवचा घोष करत भक्तांच्या काट्यांमध्ये उड्या, अंगावर काटा आणणारा VIDEO

पुरंदर,ता.20 नोव्हेंबर : पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात काटेबारस यात्रेत अंगाचा थरकाप उडवणारं दृश्य ठिकठिकाणी पाहायला मिळातं. उघड्या अंगानं बाभळीच्या काट्यांमध्ये उड्या घेणारे पुरुष या जत्रेत सर्वत्र पाहायला मिळतात. या जत्रेसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविकांची मोठी गर्दी होते. असंख्य भाविकांनी प्रथेनुसार देवाला उघड्या अंगाने दंडवत घातले. "हर भोले -हर महादेव' असा जयघोष करीत एकामागून एक असे भक्त उघड्या अंगाने उड्या घेऊन काट्यां-मध्ये लोळत होते. सुमारे 100 भक्तांनी यात सहभाग घेतला होता. काट्यात उड्या मारणाऱ्यामध्ये वकील, इंजिनियर, शिक्षकांचाही सहभाग आहे. तसेच अनेक लहान मुलांनी सुद्धा यंदा काट्यात उड्या मारल्या.