#आसाराम

Showing of 66 - 67 from 67 results
बलात्काराला आरोपींइतकीच तरूणीही जबाबदार-आसाराम बापू

बातम्याJan 7, 2013

बलात्काराला आरोपींइतकीच तरूणीही जबाबदार-आसाराम बापू

07 जानेवारीदिल्ली सामूहिक बलात्कार पीडित तरूणींने आपल्यावर अत्याचार होतेसमयी देवाचं नाव घेऊन आरोपीचा हात पकडला असता मी तुम्हाला भाऊ मानते, मी अबला आहे. देवाचे नाव घेऊन आरोपींचे हात, पाय पकडले असते तर एवढा मोठा अत्याचार झाला नसता, टाळी एका हाताने वाजत नाही हे विधान आहे स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू आसाराम बापू यांचे. दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणात आरोपींइतकीच मुलगीही दोषी होती अशी मुक्ताफळं बापूंनी उधळली आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या 'इंडिया'त बलात्कार जास्त होतात भारतात कमी होतात, महिलांनी उंबरठा ओलांडू नये अशा वादग्रस्त विधानावरून वादळ शमतं न शमतं तेच स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू आसाराम बापू यांनी या वादात आणखी तेल ओतलंय. नवी दिल्लीत आपल्या अनुयायनासमोर अनुमोदन करत असतांना बापूनी अजब ज्ञान पाजळलं. बापू म्हणतात, ज्यांनी चूक केली ते मद्यपी होते. पण त्या पीडित मुलीने सारस्वती मंत्र, गुरूदिशा घेतली असती तर आपल्या प्रियकरासोबत रात्री सिनेमाला गेली नसती आणि त्या बसमध्ये चढली नसती. आणि बसमध्ये चढलीही असती तर देवाचं नाव घेऊन आरोपीचा हात पकडला असता मी तुम्हाला भाऊ मानते, इतर आरोपींनाही ती म्हणाली असती भाऊ मी अबला आहे. देवाचे नाव घेऊन आरोपींचे हात, पाय पकडले असते तर एवढा मोठा अत्याचार झाला नसता. आसारामबापू एवढ्यावरच थांबले नाही तर टाळी एका हातानं वाजत नाही असंही म्हणाले. एकीकडे देशभरात सर्वत्र बलात्कारविरोधी कडक कायदे करण्याची तीव्र मागणी होत असताना आसाराम बापूंनी मात्र याला विरोध केलाय. अशा कायद्यांचा कायम दुरूपयोग होतो त्यामुळे बलात्कार करणार्‍या आरोपींना कडक शिक्षा नको असंही आसारामबापू म्हणत आहेत.

Live TV

News18 Lokmat
close