आषाढी एकादशी

Showing of 1 - 14 from 34 results
VIDEO : गोव्यात रंगला चिखलकाला, ऐकमेकांवर चिखल फेकून केला उत्साह!

व्हिडीओJul 13, 2019

VIDEO : गोव्यात रंगला चिखलकाला, ऐकमेकांवर चिखल फेकून केला उत्साह!

अनिल पाटील, गोवा, 13 जुलै : आषाढी एकादशीचा उत्साह संपूर्ण महाराष्ट्रात बघायला मिळतो. गोव्यातही आषाढी एकादशी निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. उत्तर गोव्यातल्या माशेलमध्ये आषाढी व्दादशीला वैष्णवांचा मेळा पांडुरंग नामात दंग होत चिखलकाल्यात रंगून जातो. शेकडो वर्षांच्या या परंपरेत हजारो भाविक चिखलकाल्यात नाचतगात कृष्णक्रीडांचा आनंद लुटतात. त्यामुळे विठ्ठल आणि कृष्ण भक्तीचा अनोखा संगम या चिखलकाल्यात पहायला मिळतो. चिखलकाला बघण्यासाठी स्थानिक लोकांबरोबर पर्यटक देखील मोठ्या संख्यने उपस्थित होते.