आरोपी Videos in Marathi

Showing of 53 - 66 from 154 results
VIDEO : रेनकोट घालून तो एटीएम फोडायला गेला

व्हिडीओJul 31, 2018

VIDEO : रेनकोट घालून तो एटीएम फोडायला गेला

बदलापूरमध्ये मांजर्ली परिसरात मंगळवारी अज्ञाताकडून एटीएम फोडण्याचा प्रयत्न झालाय. रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास कॉर्पोरेश बँकेच्या एटीएममध्ये एक चोरटा शिरला. त्यानं हत्यारांच्या मदतीनं एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला यश आलं नाही. मात्र चोरट्याचा खटाटोप सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. याप्रकरणी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय. बदलापूर शहरातील मांजर्ली पोखरकर नगर परिसरात कार्पोरेशन बँक आहे. याच बँकेला लागून बँकेचे एटीएम आहे. या एटीएम सेंटरमध्ये सोमवारी मध्यरात्री अडीच वाजता अज्ञात चोरटा शिरला. त्याने एटीएमच्या स्क्रीनवर स्प्रे मारून त्याच्याकडे असलेल्या हत्यारांनी एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. दरम्यान हा सगळा प्रकार एटीएम सेंटर मध्ये असलेल्या cctv त कैद झाला आहे. या प्रकरणी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. हा आरोपी रेनकोट घालून आणि तोंडाला रुमाल बांधून आल्याने त्याची ओळख होत नसल्याने त्याला पकडणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरणार आहे.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading