आरोपी

Showing of 3134 - 3147 from 3352 results
नगरसेवकाच्या घरावर जमावाचा हल्ला

बातम्याJun 8, 2010

नगरसेवकाच्या घरावर जमावाचा हल्ला

8 जूनकोल्हापुरातील दौलतनगर इथे जमावाने माजी उपमहापौर आणि नगरसेवक विलास वास्कर यांच्या घरावर मोठी दगडफेक केली. तसेच अवधूत माळवी याच्या खुनाच्या संशयावरून अटक केलेल्या काही आरोपींची घरेही जमावाने पेटवून दिली. 4 जून रोजी मटकाचालक अवधूत माळवी यांचा काही गुंडांनी धारदार शस्रांनी खून केला होता. या प्रकरणी राजारामपुरी पोलीसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. पण या प्रकरणातील मुख्य संशयीत आरोपी अजित तावडे, गोविंद नायडू आणि नितीन वेताळ हे तीन आरोपी फरारी आहेत. आज सकाळी संतप्त जमावाने अवधूत माळवी यांच्या खुनाच्या संशयावरून माजी उपमहापौर आणि नगरसेवक विलास वास्कर यांच्या घरावर हल्ला चढवला. तसेच फरारी असणार्‍या आरोपींच्या घरावर हल्ला चढवून घरे पेटवून दिली. त्यामुळे या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.