आरोपी

Showing of 2913 - 2926 from 3150 results
भंगार गोळा करताना स्फोट; एकजण गंभीर जखमी

बातम्याJul 24, 2010

भंगार गोळा करताना स्फोट; एकजण गंभीर जखमी

24 जुलैअहमदनगरमध्ये खारेकर्जुने इथल्या लष्कराच्या प्रशिक्षण क्षेत्रात भंगार गोळा करत असताना झालेल्या स्फोटात रवी तेलंग हा तरुण गंभीर जखमी झाला.या स्फोटात त्याला आपला एक पाय गमवावा लागला. स्थानिक पोलीस आणि डॉक्टरांच्या संगनमताने सदर प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. हे प्रकरण पैसे देऊन दडपण्याचा ठेकेदाराचा प्रयत्न पोलीस अधीक्षक कृष्णप्रकाश यांनी हाणून पाडला. आता भारतीय स्फोटक पदार्थ 1908च्या कलम 5 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात भंगार ठेकेदारांसह 7 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली तर 4 आरोपी फरार आहेत.