#आरजे मलिष्का

VIDEO : मुंबईच्या खड्ड्यांवर मलिष्का 'झिंगाट', तिचं नवं गाणं पाहिलंत का?

बातम्याJul 17, 2018

VIDEO : मुंबईच्या खड्ड्यांवर मलिष्का 'झिंगाट', तिचं नवं गाणं पाहिलंत का?

मुंबई, 17 जुलैः सुप्रसिद्ध आरजे मलिष्काचे मुंबईच्या खंड्यांवर भाष्य करणारं उपहासात्मक गाणं सध्या सोशल मीडियावर कमालीचं व्हायरल होत आहे. सैराट सिनेमातील झिंगाट गाण्याच्या संगीतावर मलिष्काचं 'गेली मुंबई खड्यात' हे गाणं साऱ्यांचंच लक्ष वेधत आहे. गेल्या वर्षी मलिष्काने सोनू तुझा माझ्यावर भरवसा नाय काय या गाण्याच्या चालीवर रस्त्यावरील खड्ड्यांवर भाष्य केलं होतं. तिच्या या गाण्याला पालिकेकडून कडाडून विरोध करण्यात आला होता. त्यामुळे मलिष्काचं यावर्षीचं खड्यांवरचं गाणं किती लोकांना झोंबणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल यात काही शंका नाही.