आरक्षण

Showing of 1262 - 1275 from 1292 results
पुण्यातले प्रसिद्ध बिल्डर डी. एस. कुलकर्णी बसपात

बातम्याMar 4, 2009

पुण्यातले प्रसिद्ध बिल्डर डी. एस. कुलकर्णी बसपात

4 मार्च, पुणेनितीन चौधरी लोकसभा निवडणुकीसाठी बसपानं 4 उमेदवार जाहीर केले. हे चारही उमेदवार ब्राम्हण समाजाचे आहेत. त्यावरून यंदाच्या निवडणुकीत बसपानं ब्राम्हण समाजाला प्राधान्यक्रम दिलाये. यातून बसपानं सोशियल इंजिनिअरिंग फॅक्टर उचलून धरण्याचा प्रयत्न केलाय. उमेदवारांमध्ये पुण्यातून प्रसिद्ध बिल्डर डी. एस. कुलकर्णी, ठाण्यातून ए.के. त्रिपाठी, नाशिकमधून महंत सुधीरदास, तर रत्नागिरीतून जयेंद्र परूळेकर यांची नावं जाहीर करण्यात आलीयेत. पुण्यातल्या पत्रकार परिषदेत प्रदेशाध्यक्ष विलास गरूड यांनी ही नावं जाहीर केली.पुण्यातले प्रसिद्ध बिल्डर डी. एस. कुलकर्णी लवकरच बसपामध्ये प्रवेश करणार आहेत. बसपापक्ष प्रवेशाबाबत डी.एस. कुलकर्णी प्रतिक्रिया देताना म्हणाले, " मला बसपाचा सोशल इंजिनिअरिंग हा फॅक्टर आवडला. सगळ्यांनाबरोबर घेऊन चालण्याचा हा सोशल इंजिनिअरिंगचा मुद्दा बसपानं उत्तर प्रदेशात राबवल्यानं मायवती सरकार उत्तर प्रदेशात यशस्वी झालं. आणि आता बसपा हाच मुद्दा भारतातल्या निवडणुकांसाठी वापरणार आहेत. मला बसपा'आरक्षणाचा मुद्दा भावला' ही भावला. जातींचं रिझर्व्हेशन न ठेवता पैशांच्या रिझर्व्हेशनचा मुद्दा त्यांनी डोळ्यांसमोर ठेवला आहे. म्हणजे जो आर्थिकदृष्ट्या गरीब आहे, त्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे. त्यांना बरोबर घेऊन चाललं पाहिजे या मुद्द्यानं मी भारावून गेलोय. बसपा हा सर्वांना बरोबर घेऊन चालणारा पक्ष आहे. " डी.एस.के.चे सर्वेसर्वा डी. एस. कुलकर्णी आता मायवतींच्या हाताखाली काम करणार. बांधकाम क्षेत्रातला स्वत:चे निर्णय स्वत:च घेणारी व्यक्ती ही मायावतींचं कसं काय ऐकणार याची सगळ्यांना उत्सुकता लागून आहे. मात्र यावर खुद्द कुलकणीर्ंचं म्हणणं काही वेगळंच आहे. ते सांगतात, " मी आजपर्यंत लोकांचे फायदे त्यांना पटवून देऊनच एवढा मोठा झालोय. तेच मी बसपात करणार आहे." पुण्यातले प्रसिद्ध बिल्डर डी. एस. कुलकर्णी यांना त्यांच्या आगामी नव्या वाटचालीसाठी शुभेच्छा.