नाशिक, 16 फेब्रुवारी : नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेलं आदिवासी आश्रम शाळा कर्मचाऱ्यांचं आंदोलन आणखी चिघळलंय. विरोध असतानाही परीक्षा घेतली जात असल्यामुळे वाद विकोपाला गेला. दरम्यान, हजारो आदिवासी कर्मचाऱ्यांनी आज नाशिकच्या इंदिरा नगरातील परीक्षा केंद्रावर हल्लाबोल केला. यावेळेस आंदोलनकर्त्यांनी रात्रपाळीतल्या कर्मचाऱ्यांना बाहेर येण्यापासून रोखल्यामुळे त्यांच्यात झटापट झाली. दरम्यान, मध्यस्थी करणाऱ्या सुरक्षा रक्षकांनाही धक्काबुक्की झाल्याचा प्रकार घडलाय. परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. तर आदिवासी आश्रम शाळा कर्मचाऱ्यांची परीक्षा घेण्यावर आदिवासी आयुक्त ठाम असल्याची माहिती आहे.