#आत्महत्या

Showing of 1860 - 1873 from 1934 results
साध्वीचा हार्ट ऍटक खोटा

बातम्याApr 23, 2010

साध्वीचा हार्ट ऍटक खोटा

23 एप्रिलमालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी साध्वी प्रज्ञा सिंगला हार्ट अटॅक आला नव्हता, अशी माहिती गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांनी दिली आहे. मेडिकल रिपोर्टमधून ही गोष्ट उघड झाली असेही बागवे यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी छातीत दुखत असल्याचे साध्वीने सांगितले. त्यानंतर तिला हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. मात्र तपासणीनंतर प्रत्यक्षात साध्वीला हार्टअटॅक आला नसल्याचे स्पष्ट झाले. आज अधिवेशनात चर्चा झालेले मुद्दे पुढीलप्रमाणे...अपंगांचा अनुशेष भरणार सरकारी नोकर्‍यांमधील अपंगांचा अनुशेष येत्या जून महिन्यापर्यंत भरून काढण्यात येईल, असे आश्वासन सरकारने आज विधानपरिषदेत दिले. अपंगांची 487 पदे भरणे शिल्लक आहेत. ती येत्या जूनपर्यंत भरू असे, सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांनी सांगितले. याबद्दलचा प्रश्न शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी विचारला होता.सदस्यांचा निरोप समारंभविधानपरिषदेतील 9 सदस्यांचा निरोप समारंभ गुरुवारी पार पडला. परिषदेतील सदस्यत्वांची मुदत संपल्याने येत्या जून महिन्यात ते निवृत्त होत आहेत. यात विधानपरिषद उपसभापती वसंत डावखरे, राष्ट्रवादीच्या सदस्या मंदा म्हात्रे, शिवाजीराव पाटील, काँग्रेसचे मुझफ्फर हुसेन,प्रतापसिंह मोहिते-पाटील, संजय दत्त आणि मधू जैन हे चार सदस्य तर शिवसेनेचे दिवाकर रावते आणि अनिल परब हे दोन सदस्य असे नऊ जण निवृत्त झाले आहेत.जागतिक मंदीमुळे नोकर्‍या नाहीत आदिवासी मुलींना विमान कंपन्यांनी नोकरी न देण्याचे कारण फक्त जागतिक मंदी हेच आहे, असे सरकारने आज विधानपरिषदेत निवेदन केले. महाराष्ट सरकारच्या आदिवासी विकास खात्याने एअर होस्टेस बनवण्याचे प्रशिक्षण 97 आदिवासी मुलींना दिले होते. पण त्या खाजगी विमान कंपन्यांच्या मुलाखतीत उत्तीर्ण होऊ शकल्या नाहीत. यामागचे कारण देताना हवाई वाहतूक मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी या आदिवासी मुली गावंढळ असल्याने त्या एअर हॉस्टेस होऊ शकल्या नाहीत, असे म्हटल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला होता. यावर निवेदन देताना आदिवासी विकास मंत्री बबनराव पाचपुते यांनी प्रफुल्ल पटेल यांचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. पटेल यांनी असे काहीच वक्तव्य केले नसल्याचे ते म्हणाले. आत्महत्येची चौकशी करणारमुलुंड येथील कपिल पाटील या युवकाने 25 मार्च रोजी पोलिसांच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली का, याची चौकशी करण्यात येईल. तसेच त्याच्या कुटुंबीयांना मदत करण्याबाबत सरकार विचार करत आहे, असे गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांनी विधानसभेत सांगितले. मुलुंडच्या कपिल पाटील याला नवघर पोलिसांनी अटक केली होती. मात्र तो पोलिसांनी नजर चुकवून पळून गेला. त्याला पुन्हा अटक केल्यानंतर जामीनावर मुक्त झाल्यानंतर तो घरी जाण्यापूर्वी मुलुंड जवळ रेल्वे रुळावर 22 मार्च रोजी मृतावस्थेत सापडला होता. त्याबाबत सुभाष देसाई यांनी प्रश्न उपस्थित केला.डॉक्टरच्या मालमत्तेची चौकशी होणारऔरंगाबाद जिल्ह्यातील घाटी हॉस्पिटलमधील डॉ. सोमवंशी यांना युवकांकडून 80 हजार रूपयांची लाच घेताना पकडले होते. त्या डॉक्टरांना मिळालेल्या जामीनाविरोधात कोर्टात अपिल करण्यात येईल. तसेच त्यांच्या मालमत्तेची जाहीर चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी विधानसभेत केली. डॉ. सोमवंशी यांनी डाव्या कानाचे 50 ते 75 टक्के कर्णबधीर प्रमाणपत्र देण्यासाठी 80 हजार रूपयांची लाच घेतली होती.